Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर तीन अधिकारी-कर्मचारी सन्मानित:उत्कृष्ट कामगिरीसाठी सीईओ गांधींच्या हस्ते सत्कार

अमरावती जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मे महिन्यात 'वॉल ऑफ फेम'वर सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, बांधकाम विभागाचे धारणी येथील सहायक अभियंता राहुल शेंडे आणि पदवीधर शिक्षक वीरेंद्र ब्राम्हण यांचा समावेश आहे. राहुल शेंडे यांना यापूर्वी सन २०२६ चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कारही मिळाला आहे. ते जिल्हा परिषदेच्या (माजी शासकीय) माध्यमिक कन्या शाळेत कार्यरत आहेत. या तिन्ही मानकऱ्यांनी एप्रिल महिन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. या तिन्ही मानकऱ्यांची घोषणा जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या वर्धापन दिनी करण्यात आली. त्यानंतर लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभावेळी सीईओ सत्यम गांधी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्रीराम कुलकर्णी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'वॉल ऑफ फेम' हा उपक्रम या वर्षी जानेवारीपासून सुरू करण्यात आला आहे. तत्कालीन सीईओ संजीता महापात्र यांची ही संकल्पना असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या कामासाठी स्पर्धा निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. प्रशासनात सकारात्मक स्पर्धा निर्माण करून कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम नवे सीईओ सत्यम गांधी यांनीही यापुढे सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/IFlzCRG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.