Type Here to Get Search Results !

अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार:पाच दिवसानंतर गुन्हा दाखल; आरोपी नात्यातील अल्पवयीन मुलगा

अकोला शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर करताच पोलिसांनी अखेर पाच दिवसांनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास संबंधित आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरातील चिमुकलीवर तिच्याच जवळच्या नात्यातील १४ वर्षीय मुलाने घरात कुणी नसताना १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला होता. परंतु तिचा पती, सासू आणि नणंद, जेठ, जेठानी यांनी तिच्यावर दबाव आणत तिला मारहाण करत पोलिसांत तक्रार करण्यास विरोध केला. त्यांच्या विरोधाला न जुमानता तिने शेवटी ५ मे २०२६ रोजी सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन गाठले. तेथे पोलिस निरीक्षक मालती कायटे यांनी त्यांना हुसकावून लावत ‘हे तुमचे कौटुंबिक मॅटर आहे. तक्रार करून काहीच होणार नाही.. तुम्ही खोटे बोलत आहात.’ असे म्हणून फिर्याद नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर त्या महिलेने पोलिस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्याकडे दाद मागितली. पोलिस अधीक्षकांनी फिर्याद नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतरही सिव्हिल लाइन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, शनिवारी या महिलेने आपल्या मुलीवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी प्रसारमाध्यमांचा आधार घेतला. या प्रकरणी तक्रार दाखल न करण्यासाठी तिच्या घरातून आणि पोलिसांकडून प्रचंड दबाव आल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने यावेळी केला. त्यानंतर शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले. तर यातील आरोपी नात्यातीलच अल्पवयीन मुलगा १४ वर्षांचा असल्याने विधी संर्घषग्रस्त बालक म्हणून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येणार आहे, अशी माहिती सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या निरीक्षक मालती कायटे यांनी दिली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZFo74w1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.