Type Here to Get Search Results !

आज आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस:अमरावतीत विशेष नोंदी घेतल्या जाणार

आज, मंगळवार, ३० जून रोजी 'आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस' साजरा केला जात आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश अवकाशातील लघुग्रहांविषयी जनजागृती करणे, तसेच पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांचे निरीक्षण आणि संशोधनाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. अमरावती येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे या निमित्ताने विशेष नोंदी घेतल्या जाणार आहेत. सन १९०८ मध्ये रशियातील तुंगुस्का येथे झालेल्या प्रचंड स्फोटाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या घटनेमुळे सुमारे २ हजार चौरस किलोमीटर परिसरातील जंगल उद्ध्वस्त झाले होते. या घटनेनंतर लघुग्रहांचा अभ्यास आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी त्यांचे सातत्याने निरीक्षण करण्याची गरज अधोरेखित झाली. २०१६ मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित करण्यात आला. लघुग्रह हे सूर्याभोवती भ्रमण करणारे खडकाळ आणि धातूयुक्त आकाशीय पिंड आहेत. त्यापैकी बहुतांश लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान असलेल्या पट्ट्यात आढळतात. पृथ्वीजवळून जाणाऱ्या काही लघुग्रहांवर जगभरातील अवकाश संशोधन संस्था सतत लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून संभाव्य धोक्यांपासून बचाव करता येईल. या निमित्ताने अमरावती येथील स्टारगेझर क्लब आणि मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने नागरिकांना अवकाश विज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढवण्याचे, खगोल निरीक्षणाची आवड जोपासण्याचे आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रा. प्रवीण गुल्हाने आणि खगोल विभाग प्रमुख विजय गिरुळकर यांनी हे आवाहन केले असून, ते स्वतःही काही नोंदी घेणार आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/bNZOMzq

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.