Type Here to Get Search Results !

दिंडोरी, पेठसह सुरगाणा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही भूकंप:रात्री 11.55 वाजता आणि पहाटे 2.44 वाजता धक्का

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यासह पेठ व सुरगाणा परिसरात शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटे भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, पहिला धक्का शनिवारी रात्री ११.५५ वाजता ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा बसला. त्यानंतर रविवारी पहाटे २.४४ वाजता ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का नोंदवला गेला. भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिक वेधशाळेपासून सुमारे ४९ किमी अंतरावर होता. ​अचानक जमीन हादरल्याने आणि घरातील वस्तू, पंखे हलल्याचे जाणवताच नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. सलग दोनदा बसलेल्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/E8qMwZS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.