Type Here to Get Search Results !

जेहूर तांडा येथे रस्त्याची दुरवस्था; शेतकरी, ग्रामस्थांची होतेय गैरसोय:तांडा सुधार वस्ती योजना राबवण्याची नागरिकांची मागणी‎

कन्नड तालुक्यातील जेहूर ग्रामपंचायतअंतर्गत जेहूर तांडा येथे शासनाच्या योजना तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत तांड्यांवर अंतर्गत रस्ते, गटारे आणि मूलभूत सुविधांसाठी निधी दिला जातो, मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या चुकीच्या कारभारामुळे चित्र दिसत नाही व तांड्यावरील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे, मात्र जेहूर ग्रामपंचायत प्रशासनाचा हाताची घडी तोंडावर बोट अशी गत झालेली आहे. सध्या पावसाळ्यात जेहूर तांडा येथे चिखल झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . जेहूर ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कन्नड पंचायत समिती गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत व तालुक्यातील लोकप्रतिनिधी लक्ष देऊन या समस्या सोडणार का ? आणि जेहूर तांडा येथे शासनाच्या तांडा सुधार वस्ती योजना राबवून या नागरिकांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडणार आहे का अशी मागणी तांडा येथील नागरिकांनी केली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GFpeaUr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.