Type Here to Get Search Results !

घरबसल्या गॅस मिळवा:स्वयंपाकाचा GAS आता 'क्विक कॉमर्स'वर! , HPCL आणि इन्स्टामार्टच्या भागीदारीत देशात पहिल्यांदाच ऑन-डिमांड सिलिंडर वितरण सुरू

भारतातील अग्रगण्य क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत एक महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारी अंतर्गत, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर भारतातील पहिली ऑन-डिमांड एलपीजी सिलिंडर वितरण सेवा सुरू करण्यात आली आहे. आता घरगुती वापरातील अत्यंत अत्यावश्यक असलेल्या एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी ग्राहकांना इन्स्टामार्टद्वारे घरबसल्या झटपट मिळणार आहे. या सेवेसोबतच, एचपीसीएलच्या नव्या पिढीतील 10 किलो वजनाचा कंपोझिट एलपीजी सिलिंडर 'HP Navya' देखील इन्स्टामार्टवर लॉन्च करण्यात आला आहे. अत्याधुनिक 'HP Navya' सिलिंडरची वैशिष्ट्ये नव्या जोडणीची (Connection) गरज नाही! या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इन्स्टामार्टवरून सिलिंडर ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासूनच घरगुती एलपीजी कनेक्शन असणे बंधनकारक नाही. त्यामुळे नोकरी किंवा शिक्षणासाठी नवीन शहरात आलेल्या लोकांसाठी आणि लहान कुटुंबांसाठी हा एक अत्यंत लवचिक आणि सुटसुटीत पर्याय ठरणार आहे. ही सेवा कशी काम करणार? दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांची प्रतिक्रिया अमितेश झा, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), इन्स्टामार्ट:"इन्स्टामार्टने आता किराणा मालाच्या पलिकडे जाऊन दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरजा पूर्ण करणारे व्यासपीठ म्हणून विस्तार केला आहे. एचपीसीएलच्या सहकार्याने एलपीजीसारखी सेवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणताना, ग्राहकांचा विश्वास आणि सुरक्षिततेचे उच्च निकष आम्ही कायम राखत आहोत." अमित गर्ग, संचालक – विपणन (Marketing), HPCL:"आमचा नवीन कंपोझिट सिलिंडर ब्रँड 'HP Navya' ग्राहकांचे जीवन सोपे बनवणारा ऊर्जा उपाय आहे. इन्स्टामार्टच्या वेगवान आणि तंत्रज्ञान-सक्षम डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकू, ज्यामुळे ग्राहकांचा गॅस खरेदीचा एकूण अनुभव अधिक समृद्ध होईल." महत्त्वाचे पाऊल: सध्या 50,000 हून अधिक उत्पादने (SKUs) वितरित करणाऱ्या इन्स्टामार्टसाठी उच्च-विश्वासार्हतेच्या उत्पादन श्रेणीत प्रवेश करण्याचे हे मोठे पाऊल आहे. तर दुसरीकडे, एचपीसीएलसाठी आपल्या पारंपरिक वितरण व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची ही एक सुवर्णसंधी ठरली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QWjpaPs

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.