Type Here to Get Search Results !

पालघरमध्ये प्रियकरासोबत गेलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू:कुटुंबीयांचा गंभीर आरोप, पोलिसांकडून तपास सुरू

पालघरमध्ये प्रियकरासोबत बाहेर गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीची प्रकृती खालावली असतानाही तिच्या प्रियकराने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. काय आहे प्रकरण? अल्पवयीन मुलगी घरात पालक नसताना कथित प्रियकराबरोबर बाहेर फिरण्यासाठी गेली होती. परंतु दोन दिवसांनी मुलगी या जगात नाही असा फोन तिच्या कुटुंबीयांना आला. आता याप्रकरणी प्रियकरानेच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुसरीकडे, कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते शेतात गेले असताना मुलगी प्रियकरासोबत बाहेर गेल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. ती नेमकी कुठे गेली आणि तिच्यासोबत काय घडले, याचीही कुटुंबीयांना माहिती नव्हती. मुलीला फोन केला असता तिने फोन उचलला नाही. ती विरारला गेली होती. ‘उद्या मी घरी येणार आहे,’ असे तिने सांगितले होते. मात्र, मुलगी घरी परतलीच नाही. त्याच रात्री नेमके काय घडले, याची माहिती आम्हाला मिळाली नाही.दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेहच घरी आणण्यात आला,असे कुटुंबीयांनी सांगितले विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजूची तब्येति बिघडल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी तथाकथित प्रियकर तिच्या शेजारी बसून येशूची प्रार्थना करत राहिल्याचे सांगितले जात आहे. यामध्येच तरुणाने वेळ घालवला असल्याचा आरोपदेखील यावेळी मृत अंजूच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. अंजू चा मृत्यू ही हत्या असून याप्रकरणी तिच्या प्रियकरासह या सर्व घटनेत दोषी असलेल्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. पोलिसांचे स्पष्टीकरण पालघर येथील रहिवासी विष्णू लहू कडू यांची मुलगी अंजली विष्णू कडू ही तिचा मित्र अमित करेला (रा. चिचपाडा) याच्याकडे राहण्यासाठी गेली होती. अमितच्या घरातून ती रात्री वॉशरूमसाठी बाहेर गेली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झाला तरी ती परत न आल्याने अमितने घराबाहेर पाहिले. त्यावेळी घरापासून काही अंतरावर ती निपचित पडलेली होती . या घटनेप्रकरणी सध्या कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेच्या चौकशीत जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी माध्यमांना दिली. सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती तपासली जात आहे. हेही वाचा.. नरहरी झिरवळांचा आंदोलक विद्यार्थ्यांना सल्ला:खाऊन-पिऊन आंदोलन करा; 14 दिवसांपासून उपोषण सुरू; लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि उपोषण गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे. आपल्या 14 प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे.सविस्तर वाचा..

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3yWBCte

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.