निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत राज्यातील २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांचा १८ ऑगस्ट रोजी जारी एसआयआरचा डेटा असे सांगत आहे की, वगळल्या जाणाऱ्यांचा मुद्दा किमान १२० मतदारसंघांत प्रभावी असेल. कारण नोव्हेंबर २०२४ मध्ये जेवढ्या मतांच्या फरकांनी विजय मिळवला होता त्यापेक्षा ३० ते ४६० पटींनी जास्त मतदार यादीतून ‘कट’ झाले आहेत. तसेच निसटत्या फरकाने विजय मिळवणाऱ्यांना २०२९ मध्ये ‘एसआयआर’ची आकडेवारी प्राधान्याने लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यांच्या निसटत्या विजयाच्या मतदारसंघांत मुस्लिमांची नावे तुलनेने अधिक संख्येने वगळल्याचा आक्षेप काँग्रेस, समाजवादी पार्टीचे नेते घेत आहेत. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले की, २०२४ मध्ये ९ कोटी ७८ लाख मतदार होते. त्यापैकी ७.७१ कोटींचे (७८.८५%) प्रगणक अर्ज प्राप्त झाले. वगळल्या जाणाऱ्यांत ७६.८० लाख (७.८५%) कायमस्वरूपी स्थलांतरित, ७५.५२ लाख (७.७२%) पत्ता न सापडलेले, ३४.८१ लाख (३.५६%) मृत, १७.६३ लाख (१.८०%) दुबार नोंदणी असलेले, तर २.२३ लाख इतर अपात्र मतदार आहेत. २०२४ मध्ये २२ मुस्लिम मबहुल मतदारसंघांत महायुती १३ जागी विजयी एसआयआरमुळे २२ प्रमुख मुस्लिमबहुल मतदारसंघांचे चित्र बदलणार असे दिसत आहे. २०२४ मध्ये या २२ पैकी १३ जागांवर महायुती, तर ६ जागांवर मविआने विजय मिळवला होता. तेथे विजयाचे अंतर खूपच कमी होते. याविषयी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी, काँग्रेसचे संदेश कोंडविलकर म्हणाले की, घरोघरी जाऊन पडताळणीचे काम झालेलेच नाही. दुसरीकडे भाजपने आपल्या समर्थकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. नाव वगळण्याची प्रमुख कारणे कायमस्वरूपी स्थलांतरित ७६.८० लाख
पत्ता न सापडलेले (बेपत्ता) ७५.५२ लाख
मृत मतदार ३४.८१ लाख
दुबार नोंदणी १७.६३ लाख दिग्गजांच्या मतदारसंघांत वगळणीचा आकडा देवेंद्र फडणवीस (नागपूर द. प.) १,५४,०१०
एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखाडी) १,११,०८३
डॉ. जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा) २,१३,६२७
आदित्य ठाकरे (वरळी) १,०५,६१३
अबू असीम आझमी (मानखुर्द) १,४६,९६५
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/haEOysd
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:विधानसभेत विजयाच्या फरकापेक्षा कट होणारे मतदार 30 ते 460 पट जास्त; 2029 च्या विधानसभेला 288 पैकी किमान 120 मतदारसंघांत ‘एसआयआर’ प्रभावी ठरण्याची शक्यता
August 21, 2026
0