महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या अंतर्गत गणेशोत्सवाला युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा’ यादीत स्थान मिळवून देण्यासाठी गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शासनाच्या सर्व मंत्रालयीन विभागांना गणेशोत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पर्यटन व रोजगाराला मोठा बूस्ट मिळेल गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित करून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवण्याचा शासनाचा हा प्रयत्न केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक व आर्थिक ओळख जागतिक स्तरावर मजबूत करणारा आहे. सर्व विभागांचा सहभाग, डिजिटल तंत्रज्ञान आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन यामुळे राज्याच्या पर्यटन व रोजगाराला मोठा बूस्ट मिळेल. शाळा-महाविद्यालयांमध्ये शाडू मूर्तींच्या कार्यशाळा काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये : ३६ जिल्ह्यात कार्यक्रम
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/neRjyL4
शासकीय विभागांचा सहभाग:लाडका बाप्पा जाणार सातासमुद्रापार... गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ बहुमान, 480 सार्वजनिक मंडळांना 1.50 कोटींची पारितोषिके
August 17, 2026
0