Type Here to Get Search Results !

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:पाच महिन्यांत तेल 8, डाळी 6, तर दूध 3 रुपये महागले, रेशनच्या 99% वस्तूंचे भाव वाढले

शनिवार, २८ फेब्रुवारी म्हणजेच ज्या दिवशी अमेरिका-इराण युद्ध सुरू झाले होते... त्या दिवसापासून सोमवार, ३ ऑगस्टपर्यंत सामान्य माणसाचा खाण्यापिण्याचा खर्च वेगाने वाढला आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या प्राइस मॉनिटरिंग सिस्टिमनुसार, या काळात १६ पैकी १५ प्रमुख खाद्यवस्तूंचे भाव वाढले आहेत. यातही सर्वात जास्त वाढ डाळी आणि तेलामध्ये झाली आहे. हरभरा डाळ ४.६५ रुपये, तूर डाळ ५.९६ रुपये, उडीद ५.७१ रुपये, साखर २.२५ रुपये, मूग डाळ ४.५५ रुपये प्रतिकिलोने महागली आहे. तसेच दूध ३ रुपये आणि मोहरीचे तेल ७.५६ रुपये प्रतिलिटरने महागले आहे. तांदळाचे भाव १.५७ रुपये आणि मिठाचे भाव ०.८५ रुपये प्रतिकिलोने वाढले. तज्ज्ञांच्या मते, डाळींच्या किमती वाढण्याचे कारण यंदाचा कमकुवत आणि लहरी मान्सून आहे. जुलैअखेरीस खरीप डाळींची पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ७% कमी झाली. उत्पादनात घट आणि आयात वाढण्याच्या शक्यतेने बाजारात किमती वाढल्या. डॉ. मनोरंजन शर्मा, मुख्य अर्थतज्ज्ञ, इन्फोमेरिक रेटिंग मोठे कारण- इराण युद्ध, कमकुवत मान्सून व जगभरात वाढलेले भाव तज्ज्ञांच्या मते, डाळी आणि खाद्यतेलांच्या किमतीवर अद्यापही दबाव कायम आहे. कमकुवत मान्सूनमुळे खरीप पेरणीचे क्षेत्र घटल्याने डाळींच्या उत्पादनाबाबत चिंता वाढली आहे. तसेच खाद्यतेलांबाबत भारताचे आयातीवरील अवलंबित्व, आंतरराष्ट्रीय बाजारात पाम आणि सोया तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे आयातीचा खर्च वाढला आहे. पुढे काय? ऑगस्टपासून सणासुदीचा काळ वाढवणार भाव... ऑगस्टपासून सुरू होणारे रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीसारख्या सणांदरम्यान डाळी आणि खाद्यतेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. जागतिक किमती आणि आयातीच्या खर्चात घट झाली नाही तर या दोन्ही वस्तूंच्या किमतींवर आणखी दबाव राहण्याची शक्यता आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TGYqkeD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.