शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आणि संजय गरुड याला अखेर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. नाशिकरोड न्यायालयाने २८ जुलै रोजी गरुडला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्याने पोलिस पथक त्यांचा ताबा घेण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिस कोठडीतील कसून चौकशी टाळण्यासाठी गरुड आधीच रुग्णालयात दाखल झाला होता. पोलिस ताबा घेणार तितक्यात एका बड्या नेत्याचा डॉक्टरांना फोन आला आणि डॉक्टरांनी गरुडला पुन्हा रुग्णालयात ॲडमिट करून घेतले. गरुडचा ताबा न मिळाल्यामुळे पोलिस पथकाला रिकाम्या हाताने न्यायालयात परतावे लागले. त्यानंतर न्यायालयात गरुडच्या वकिलांनी वय आणि वैद्यकीय स्थितीचे कारण भक्कमपणे मांडले. या सर्व घडामोडींची आणि कारणांची दखल घेत गरुडला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SeUD1Hv
शालार्थ आयडी घोटाळा:संजय गरुडला न्यायालयीन कोठडी
August 01, 2026
0