१ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, तुळशी पूजा व पाद्यपूजा यांची ऑनलाइन नोंदणी २६ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासह आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ३१ मार्चपर्यंतच्या श्री विठ्ठलाच्या नित्य पूजेची संपूर्ण नोंदणी झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मंदिर समितीच्या वतीने १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात आली होती. याद्वारे पहिल्या टप्प्यात ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील पूजा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यातील पूजा उपलब्ध करून दिल्या होत्या. या कालावधीत उपलब्ध झालेल्या पूजेतून विठ्ठलाच्या संपूर्ण नित्यपूजेची नोंदणी झाली आहे. याशिवाय, रुक्मिणीमातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी पूजेचीदेखील नोंदणी झाली आहे. यामधून मंदिर समितीला आतापर्यंत ४१ लाख ९३ हजार इतके देणगी मूल्य मिळाले आहे. संकेतस्थळावरून करा नोंदणी : श्रोत्री दुसऱ्या टप्प्यातील दोन्हीकडील पाद्यपूजा, तुळशी पूजा व रुक्मिणीच्या नित्यपूजा अजूनही नोंदणीसाठी शिल्लक असून https://ift.tt/hoWKtRy या मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून भक्तांनी पूजेची नोंदणी करावी, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pI6Sjf1
विठ्ठल पूजेसाठी 1 दिवसात 3 महिन्यांची ऑनलाइन नोंदणी:26 डिसेंबरपासून झाली नोंदणीला सुरुवात; महाराष्ट्रासह आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रातून बुकिंग
December 27, 2024
0