Type Here to Get Search Results !

यवतमाळला वीज पडून महिला ठार; नाशिक, जळगावात जोरदार पाऊस:नांदेड, जालना शहरासह नगर जिल्ह्यात काही भागात रिमझिम

विदर्भ-उत्तर महाराष्ट्रात शुक्रवारी सकाळी व दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसात अंगावर वीज पडल्याने एक महिला ठार, तर एक जखमी झाल्याची घटना घडली. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला, तर जळगाव जिल्ह्यात पावसासह गारपीट झाल्याने तेथील कांद्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मराठवाड्यात जालना आणि नांदेड शहरात पावसाचा शिडकावा झाला. मात्र संभाजीनगरसह अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते. खान्देशात जोरदार पाऊस खान्देशात दिवसभर ढगाळ वातावरण असून शुक्रवारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव शहरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सात मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याच्या वर्तवल्यानुसार शुक्रवारी जिल्ह्यात दुपारी ठिकठिकाणी पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील काकडदा येथे जोरदार पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात शिरपूर, पिंपळनेर पट्टा तसेच धुळे शहरातही पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे सकाळी सात वाजेच्या सुमारास २० मिनिटे हलक्या सरी कोसळल्या. भुसावळ तालुक्यातही अनेक भागांमध्ये शिडकाव झाला. अमरावती,अकोल्यातही पावसाची हजेरी यवतमाळ जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासूनच काही भागात ढगाळी वातावरण होते. त्यातच शेतातून घराकडे जाणाऱ्या मेघा गणपत पानघाटे वय ४५ वर्षे रा. केगाव ता. मारेगाव या महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मी वासुदेव तोडासे वय ५० ही महिला जखमी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही शुक्रवारी तुरळक पाऊस पडला. त्याचप्रमाणे शहरात पावसाचा हलका शिडकावा झाला. अकोला जिल्ह्यात ठिकाणी जाेरदार तर काही गावात रिमझिम पाऊस झाला. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला, ओवा, कापसाला बसला आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. बुलडाणा जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीची शक्यताही वर्तवली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अाजही पावसाची शक्यता शनिवार, २८ डिसेंबर रोजी उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. साेमवार, ३० डिसेंबरपासून मात्र ढगाळ व पावसाळी वातावरण निवळेल. वातावरण पुन्हा काेरडे आणि निरभ्र हाेऊन थंडी पुन्हा वाढेल, असेही सांगण्यात आले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/elko4bt

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.