Type Here to Get Search Results !

वैजापूर तालुक्यातील थरार:बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या 6 वर्षीय मुलीला शेजाऱ्याने 100 फुटापर्यंत पाठलाग करून वाचवले

बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीला वाचवण्यासाठी शेजाऱ्याने जिवाची बाजी लावून बिबट्याचा १०० फुटांपर्यंत पाठलाग केल्याने चिमुकली थोडक्यात बचावली. हा अंगावर शहारे आणणारा थरार वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे रविवारी घडला. तलवाडा गावालगत आयनार वस्ती असून येथील बालिका श्रुती नामदेव आयनर (६) ही नेहमीप्रमाणे घराच्या पाठीमागे रविवारी सायंकाळी खेळत होती. याच वेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरडा ऐकू आल्याने कडू बोडखे, दिनकर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता १०० फुटांपर्यंत पाठलाग करून मुलीला बिबट्याच्या ताबडीतून वाचवले. बालिकेच्या मानेवर, कानावर व गालावर जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण काही दिवसांपासून तलवाडा येथील वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही वर्षांपूर्वी बल्हेगाव येथे बिबट्याने काही जनावरांचा फडशा पाडला होता. मन्याड खोऱ्यात देखील एका बिबट्याचा साबर काडींच्या झाडात अडकून मृत्यू झाला होता. पण वन अधिकाऱ्यांनी बिबट्या नाही म्हणून हात झटकले होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/xslazVF

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.