Type Here to Get Search Results !

धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तूल;‎ दमानियांनी पोस्ट केला व्हिडिओ:मुख्यमंत्री माझ्या लेकराला‎न्याय देतील- पंकजा मुंडे‎

अंजली दमानिया गुरुवारी २‎व्हिडिओ ट्विट केले. यापैकी एका ‎व्हिडिओत मंत्री धनंजय मुंडे व‎त्यांचे विश्वासू वाल्मीक कराड‎ कारमध्ये बसल्याचे दिसते. कार मुंडे‎ चालवत असून, वाल्मीक कराड ‎त्यांच्या शेजारी बसल्याचे दिसत ‎आहेत. दुसऱ्या व्हिडिओत धनंजय‎ मुंडे यांचा हातात पिस्तूल असल्याचा ‎फोटो आहे. सामाजिक कार्यकर्त्या ‎अंजली दमानिया ट्विटमध्ये धनंजय ‎मुंडे यांच्या या कृतीवर संताप व्यक्त‎करत म्हणाल्या, हे असले बॉस?‎ इन्स्टाग्रामवर अशी रिल्स‎ दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय ‎प्रेरणा घेणार? जगमित्र शुगर्सचे ६‎ सातबारे मी डाऊनलोड केले. ३५५४‎ गुंठे जमीन धनंजय मुंडे व वाल्मीक ‎कराड यांची जमीन एकत्र आहे,‎असे त्या म्हणाल्या.‎ वाल्मीक कराड यांना अटक का‎होत नाही? मंत्री धनंजय मुंडे हे‎वाल्मीक कराड यांचे निकटवर्तीय‎असून त्यांना त्यामुळे अटक होत ‎नाहीय. त्यामुळे २८ डिसेंबरला ‎बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा निघत‎आहे, असे बीडचे आमदार संदीप ‎क्षीरसागर यांनी गुरुवारी सांगितले.‎ ‎पंकजा मुंडे‎‎कोल्हापुरात‎‎म्हणाल्या, या‎‎प्रकरणी सर्वात‎‎अगोदर मी‎‎गोपीनाथ गडावरून‎एसआयटी स्थापन करण्याची मागणी‎केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे ते या‎प्रकरणात जातीने लक्ष घालून न्याय‎भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला‎न्याय देतील.‎ हत्या करणाऱ्यास सोडू नका,‎थेट फाशी द्या : धनंजय मुंडे‎ ‎मंत्री धनंजय मुंडे‎‎यांनी गुरुवारी ‎‎बीडच्या ‎‎मस्साजोग‎‎ प्रकरणावर ‎‎भूमिका स्पष्ट‎‎ केली. संतोष‎ देशमुख यांच्या हत्याकांडातील ‎आरोपी माझ्या जवळचा असला तरी‎ त्याला सोडू नका. त्याला थेट‎फासावर चढवा, असे ते म्हणालेत. ‎आता या प्रकरणाला वेग येऊ शकतो.‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JLpHoyl

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.