Type Here to Get Search Results !

‘सुपरस्पेशालिटी’मध्ये दहापैकी चारच विभागात आंतररुग्ण सेवा कार्यान्वित:अवघड शस्त्रक्रियांची प्रतीक्षाच; ‘सर्वाेपचार’मधील रेफर रुग्णांवरच उपचार‎

बहुप्रतीक्षित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात गेल्या महिन्यात दहा विभागात आंतर रुग्णसेवा सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता महिनाभरानंतरही सुपरस्पेशालिटी रुग्णालयामध्ये अद्यापही जळीत रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरॉलॉजी विभागातील अवघड शस्त्रक्रियांची प्रतीक्षाच आहे. रुग्णालयाने जाहीर केलेल्या दहा विभागांपैकी केवळ चारच विभागात आंतररुग्ण सेवा सुरू आहे. त्यातही ‘सर्वोपचार’मधील रेफर रुग्णांवरच उपचार केले आहेत. सोमवारी प्रत्यक्ष जाऊन ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने पाहणी केली असता हे चित्र समोर आले. रुग्णालयात कार्डीआेलॉजी विभागात आतापर्यंत सात अॅन्जिआेग्राफी आणि एक अॅन्जिआेप्लॅस्टी झाली आहे. तर सध्या केवळ कान-नाक-घसा विभागातील किरकोळ शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाली. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक आमदारांनीही गेल्या महिन्यात रुग्णालयात आंतरुग्ण सेवा तातडीने सुरू करण्यासाठी मोठ्या पाहणीचा आव आणत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते. नव्याने सुरू होणाऱ्या आंतरुग्ण विभागात सर्व सुविधा पुरवण्यात येतील तसेच अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांची चमू तयार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. उर्वरित पान ४ सुपर स्पेशालिटीतील आंतररुग्णांसाठी दहा विभाग सुरू केल्याचे मागील महिन्यात सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्यापैकी कार्डियोलॉजी (हृदयरोग), नेफ्रॉलॉजी (कीडनी रोग), न्यूरोसर्जरी (मेंदू शल्य चिकित्सा), बर्न अॅन्ड प्लास्टिक सर्जरी (जळीत व प्लास्टिक सर्जरी विभाग) हे चारच विभाग आंतरुग्ण विभागात सुरु आहेत, असा फलक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. मात्र, यातील केवळ हृदयरोग विभागातच आंतररुग्ण सेवा सुरु झाली आहे. तेथे आतापर्यंत आठ रुग्णांनी लाभ घेतल्याची रुग्णालयाच्या दप्तरी नोंद आहे. पॅथॉलॉजी, ॲनेस्थेसियोलॉजी, यूरोलॉजी, युरोसर्जरी, रेडियोलॉजी असे मिळून विविध ते दहा विभाग आहेत. या विभागापैकी रेडियोलॉजी विभागातील सिटी स्कॅन व एमआरआय सुविधा उपलब्ध आहेत. ^सुपरस्पेशालिटीत कार्डियोलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोसर्जरी, बर्न अॅन्ड प्लास्टिक सर्जरी विभागात आंतरुग्ण सेवा सुरु केली आहे. हृदयरोग विभागात एक अॅन्जिआेप्लॅस्टी, सात एक अॅन्जिआेग्राफी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. बर्न अॅन्ड प्लास्टिक सर्जरी विभागात पहिली शस्त्रक्रिया होणार आहे. सध्या सर्वोपचार रुग्णालयातून रेफर केलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. लवकरच सुपरस्पेशालिटी पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. - डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. हृदयरोग विभागात १ अॅन्जिआेप्लॅस्टी, सात एक अॅन्जिआेग्राफी लवकरच सुपरस्पेशालिटी पूर्ण क्षमतेने सुरु होणार

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/dQHT9sG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.