Type Here to Get Search Results !

उद्धवसेनेत 2 मर्सिडीज दिल्यावर पद मिळते- उपसभापती गाेऱ्हे:नंतर म्हणाल्या- माझ्याकडून रुपयाही घेतला नाही, त्याबद्दल ऋणी

उद्धवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होते, असा खळबळजनक आरोप वर्षभरापूर्वीच उद्धवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदेसेनेच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी केला. दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या वेळी गोऱ्हे म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत त्यांचे पक्ष संघटनेवर लक्ष होते. उद्धवसेनेतील नेत्यांना मात्र आम्ही नको झालो होतो. २०१४ नंतर काही गोष्टी बदलल्या. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. मात्र आमदारांनाच त्यांच्या भेटी मिळत नव्हत्या.’ दरम्यान, या आरोपांबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, हे गयेगुजरे लोक आहेत. राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं करून घेतलं आहे. त्या महिला आहेत त्यावर मी काही बोलणार नाही.’ दरम्यान, गोऱ्हेंच्या मुंबईतील बंगल्याबाहेर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन केले. साहित्य महामंडळाला पाठवले नाराजीपत्र साहित्य महामंडळ अध्यक्षा उषा तांबे यांना राऊत यांनी पत्र लिहिले ‘एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन झाले. काही टिनपाट निमंत्रितांनी संमेलन मंचाचा राजकीय वापर केला. महामंडळ याची जबाबदारी घेईल का, अन्यथा माफी मागावी’ नीलम गोऱ्हेंनी व्यासपीठाचा गैरवापर केला संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय वक्तव्य करण्यासाठी नाही. तुमचे मतभेद असेल तर ती बाहेर ठेवा. राजकीय व वैयक्तिक आरोप करण्याचे हे स्थान नाही. खरं तर राजकारण्यांचा संबंध आणि संमेलनातील वक्तव्य याची महामंडळाने आचारसंहिता तयार करायला हवी. नीलम गोऱ्हे यांनी या व्यासपीठाचा गैरवापर केला. - संजय नहार, आयोजक, मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली २७ वर्षांत ९ पदे १८ मर्सिडीज देऊन घेतली काय? उद्धवसेना उद्धवसेनेेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर डॉ. नीलम गोऱ्हे यांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘२२ फेब्रुवारी १९९८ रोजी म्हणजे २७ वर्षांपूर्वी डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आतापर्यंत त्यांना ९ पदे मिळाली आहेत. मग त्यांनी ९ मर्सिडीज दिल्या आहेत काय?’ असा सवालही केला. 2002 : विधान परिषद सदस्य (पहिला कार्यकाळ) 2008 : विधान परिषद सदस्य फेरनिवड (दुसरा कार्यकाळ) 2010 : शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या 2011 पासून शिवसेना उपनेत्या 2014 : विधान परिषद सदस्य फेरनिवड (तिसरा कार्यकाळ) 2015 : विशेष हक्क समिती अध्यक्ष, विधान मंडळ 2019 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड 2020 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून फेरनिवड (चौथा कार्यकाळ) 2020 : विधान परिषद उपसभापती म्हणून फेरनिवड उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात इतके मिळूनही अन्याय म्हणत असाल तर तुम्हाला साहित्याची पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो, ‘हा शुद्ध कृतघ्नपणा आहे’ असेही अखिल चित्रे यांनी म्हटले आहे. उद्धव सुसंस्कृत, वेेळेचे नियोजन नाही : गोऱ्हे टीकेची झोड उठल्यावर गोऱ्हे म्हणाल्या की,‘पक्षाने मला कधी १ रुपया मागितला नाही. मी बाळासाहेब आणि उद्धव यांची ऋणी आहे. माझा अपवाद सोडला तर मात्र या गोष्टी घडत होत्या. उद्धव सुसंस्कृत नेते आहेत, परंतु त्यांना वेळेचे नियोजन करता आले नाही हे वास्तव आहे.’ गोऱ्हेंनी किती गाड्या दिल्या : संजय राऊत खा. राऊत गोऱ्हेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, गोऱ्हेंना पक्षाने ४ वेळा आमदार केले म्हणजे त्यांनी ८ मर्सिडीज दिल्या का? त्याच्या पावत्या दाखवाव्यात, असे आव्हान दिले. तर अंबादास दानवे म्हणाले की, मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आज राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. पक्षाने मला कधीही पैसे मागितले नाहीत. उलट मोठा विकास निधी दिला.’ सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘गोऱ्हे पक्षात ३० वर्षे होत्या. त्या कायम मातोश्रीवर पडीक असायच्या. कारण इतर कोणालाही फिरकू द्यायच्या नाहीत. त्यांच्याच सहीने गोष्टी पुढे सरकायच्या. त्यांनी किती कमावले असेल ते सांगावे.’

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/dzbLQ96

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.