कर्नाटकातील घटनेचे पडसाद सोमवारी साेलापुरात उमटले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने सात रस्ता येथे दुपारी १२ च्या सुमारास कर्नाटकची एसटी अडवली. ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घाेषणा देत समोरच्या काचेवर भगव्या रंगात ‘जय महाराष्ट्र’ लिहिले. एसटी चालकाचा हार घालून सत्कारही केला. ‘महाराष्ट्राची संस्कृती कर्नाटकसारखी नाही. आम्ही काळे फासणार नाही. म्हणून कर्नाटक एसटी चालकाचा सत्कार केला,’ अशा प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिल्या. शिंदे गटानेही सोलापूरच्या एसटी स्थानकात परिसरात आंदाेलन केले. शिवसैनिकांनी एसटी चालकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, असा सज्जड इशाराही दिला. इकडे, कर्नाटकचे गृहमंत्री जी.परमेश्वर यांनी संयम राखण्याचे आवाहन कन्नड आणि मराठी भाषिकांना केले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/vJD1F6i
सोलापूरमध्ये कर्नाटकच्या एसटीवरभगव्या रंगात लिहिले, ‘जय महाराष्ट्र’:शिवसेनेकडून गांधीगिरी, सोबत सज्जड इशाराही
February 24, 2025
0