Type Here to Get Search Results !

जतमध्ये 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, खून:आरोपीने मृतदेह ठेवला पेटीमध्ये, नराधम आरोपी मृत मुलीच्या घरामागेच होता वास्तव्यास

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील करजगी येथे एका चार वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी संशयित पांडुरंग कळ्ळी याला अटक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आरोपीने मुलीचा खून करून तिचा मृतदेह घरातील पेटीत लपवून ठेवला होता. मृत मुलगी आपल्या आजी-आजोबांसोबत करजगी येथे होती. तिचे वडील रत्नागिरी येथे कामानिमित्त गेले होते, तर आई माहेरी कर्नाटकमध्ये प्रसूतीसाठी होती. सकाळी मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनाही माहिती देत संपूर्ण गावभर शोधमोहीम राबवून चौकशी केली. आरोपीही सहभागी झाला शोधमोहिमेत मुलीच्या घराच्या मागे राहणारा पांडुरंग कळ्ळी गावकऱ्यांसोबत शोध मोहिमेत सामील होता. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने मृत मुलीचा मृतदेह आपल्या घरातील पेटीत प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवला होता.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7kQBUf5

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.