Type Here to Get Search Results !

नांदगावच्या शिवसृष्टीत शिवरायांचा आशियातील सर्वात उंच 51 फुटांचा पुतळा:तीन एकरांवर असेल शिववस्तुसंग्रहालय, शिववाचनालय, शिवभाेजनालयासह 100 आसनी सिक्स डी हाेम थिएटर

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात तीन एकरांवर शिवसृष्टीची उभारणी सुरू आहे. आशिया खंडातील सर्वात उंच म्हणजे, ५१ फुटांचा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. याशिवाय शिवछत्रपती, छत्रपती संभाजीराजे यांच्यावरील साहित्य ग्रंथांसह इतर इतिहास ग्रंथांनी परिपूर्ण असे शिववाचनालय, शिववस्तुसंग्रहालय, एेतिहासिक चित्रपट बघण्यासाठी १०० आसनी सिक्स डी थिएटर असेल. मनमाडकडून नांदगाव शहरात प्रवेश करण्यापूर्वीच ही शिवसृष्टी नजरेस पडते. ७१ फूट उंचीचे बेसॉल्ट दगड आणि किल्ल्याच्या धर्तीवर उभारलेले भव्य प्रवेशद्वार, आतमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आशिया खंडातील सर्वात उंच म्हणजे, २० फुटांच्या बेसवर ३१ फुटांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाच या शिवसृष्टीची भव्यता दर्शवून जाताे. या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, ताे पूर्णत: ब्राँझ धातूमध्ये बनवला गेला आहे. धुळ्याच्या सरबत पाटील या कारागिराने पुतळा घडवला आहे. ऊन, वारा, पाऊस याचा यावर कुठलाही परिणाम हाेऊ नये याकरिता फायबर मेटलचा यात वापर करण्यात आला आहे. दीड वर्षात पूर्ण काम शिवसृष्टीकरिता एकूण ५० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, सध्या अश्वारूढ पुतळा, शिवाजी महाराजांचा इतिहास भिंतीवर चितारण्याचे काम सुरू आहे. प्रवेशद्वाराचे निम्मे काम असे जवळपास ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. अजून दीड वर्षात या संपूर्ण शिवसृष्टीचे काम पूर्ण हाेईल. - शाम लाेंढे, आर्किटेक्ट शिवप्रेमींना उत्सुकता तीन एकरवरील ही भव्य शिवसृष्टी पूर्ण होण्यासाठी अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार असला तरी आत्तापासूनच शिवप्रेमींना या शिवसृष्टीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. येथील काम सुरू असतानाही येथे शिवप्रेमीची गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे. शिवभाेजनालय : अस्सल मराठी पदार्थ पाेटपूजा करण्यासाठी येथे १०० लाेकांची बसण्याची क्षमता असलेले शिवभाेजनालय असेल. झुणका-भाकर, वांग्याचे भरीत, ठेचा, पुरणपाेळी यांसारखी मराठमाेळी पक्वान्नेच येथे उपलब्ध असतील. स्थापत्यकलेचा उत्तम अाविष्कार शिवसृष्टीत शिवकालीन आणि पेशवेकालीन स्थापत्यकलेचा वापर करण्यात आला आहे. येथील स्थापत्य पाहताना शिवप्रेमींना भुरळ पडते. सर्व बाबी डोळ्यापुढे ठेवत याची रचना केली आहे. स्थापत्य : काळ्या पाषाणाचा वापर शिवसृष्टीचे भव्य प्रवेशद्वार, भिंती, आतील इमारती यांना किल्ल्याचाच लूक यावा याकरिता बेसाॅल्ट प्रकारच्या काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Ld13pYU

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.