Type Here to Get Search Results !

आज सायंकाळी 7 वाजता कुंभमेळ्यासाठी धावणार विशेष रेल्वे:1882 किमीचा प्रवास

कुंभमेळा विशेष रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते पाटणा गाडीचे आरक्षण फुल्ल झाले आहे. छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून विशेष रेल्वे गुरुवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. या विशेष रेल्वेच्या आरक्षणाला ३४० पेक्षा जास्त प्रतीक्षा आहे. नियोजित वेळेनुसार विशेष रेल्वे बुधवारी निघणार होती. परंतु, सुधारित वेळापत्रकानुसार रेल्वे गुरुवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून प्रयागराजसाठी निघणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथून २० आणि २५ फेब्रुवारीला विशेष रेल्वे कुंभमेळ्यासाठी सोडली जाणार. ही छेवकी स्थानकावर २२ फेब्रुवारी रोजी रात्री १.४५ वाजता पोहोचेल. पुढे पाटणा येथे २२ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. पाटणा येथून परतीसाठी २२ फेब्रुवारीला ती दुपारी ३.३० वाजता निघाल्यानंतर रात्री ११.१० वाजता छेवकी स्थानकावर येईल. आल्या मार्गाने संभाजीनगर स्थानकावर २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. रेल्वे पाटण्यापर्यंत १८८२ किमी इतका प्रवास करेल.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6kwvSet

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.