सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन दिल्ली द्वारा संचालित इंग्लिश ऑलिम्पियाड या स्पर्धेत प्रबोधन विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी सहभागी होत यश प्राप्त केले . सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असूनही यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यश मिळवले. पाचवीतून वेदांत वानखडे, सातवीचा प्रज्ज्वल धांडे, आठव्या इयत्तेतील दिव्या ढाकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय सानिका गावंडे, तृतीय आर्यन जळमकर या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. नववीतून प्रथम क्रमांक शरयू लांडे, द्वितीय शर्वरी खेडकर, तृतीय शर्वरी वानखडे, दहावीतून प्रथम मनस्वी पुंडकर व श्रावणी टरले, द्वितीय वैष्णवी अडॊळे, तृतीय रितिका पाचे यांनी पटकावला . प्रत्येक विद्यार्थ्याला सुवर्ण पदक व प्रमाणपत्र दिले. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या योगिता बयस, रामदास जावरकर व स्वप्निल घाटे यांना प्रमाणपत्र वितरित केले. या ऑलिम्पियाड परीक्षांचे आयोजन राजकुमार बावनकुळे यांनी केले. विद्यार्थ्यांचे प्राचार्या प्रतिभा संत, उपप्राचार्य नरेंद्र गोंडणे, आर. एम. बावनकुळे, गजानन सरदार यांनी अभिनंदन केले. तीन विद्यार्थिनी ठरल्या पुढील परीक्षेसाठी पात्र यातील इयत्ता नववीची शरयू लांडे, इयत्ता दहावीची मनस्वी पुंडकर आणि श्रावणी टरले या तीन विद्यार्थिनी इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेच्या सेकंड लेव्हलसाठी क्वॉलिफाय झाल्या आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/y05ZIVi
इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रबोधन विद्यालयाचे सुयश:पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी घेतला सहभाग
February 19, 2025
0