Type Here to Get Search Results !

पालकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; यूट्यूबर अलाहाबादियावर गुन्हा:समाजातील सर्वच स्तरातून टीकेची झाेड

एका कार्यक्रमात पालक आणि महिलांवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्व मखिजा, कॉमेडियन समय रैना आणि शोच्या आयोजकांविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दिल्लीतील भारत मंडपम येथे २०२४ च्या राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादियाला सन्मानित केले होते. त्याला डिसरप्टर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याची देशभरामध्ये चर्चा झाली होती. वाद वाढताच मागितली माफी माझी टिप्पणी अयोग्य होती. विनोद हा माझा प्रकार नाही. मला फक्त माफ करा एवढेच म्हणायचे आहे. जे काही घडले त्याचे कोणतेही औचित्य मी देऊ इच्छित नाही. मला फक्त माफी मागायची आहे. मी संबंधित शोच्या निर्मात्यांना व्हिडिओमधील वादग्रस्त भाग काढून टाकण्याची विनंती केली आहे. कदाचित तुम्ही मला माणुसकीच्या आधारावर माफ कराल, असे त्याने जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले. तर कारवाई करणार- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. हा शो अश्लील पद्धतीने चालवला जात असल्याचे आढळून आले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, परंतु जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. हे बरोबर नाही. प्रत्येकाच्या मर्यादा असतात. आम्ही अश्लीलतेसाठीही नियम निश्चित केले आहेत. मर्यादा ओलांडल्या तर कारवाई केली जाईल,’असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रणवीरचे दीड कोटी फॉलोवर रणवीर अलाहाबादिया याचे यूट्यूबवर तब्बल १ कोटी ६० लाख फॉलोवर्स आहेत. रणवीर हा प्रसिद्ध पॉडकास्टरही आहे. नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येणारा रणवीर आता मात्र चांगलाच वादात अडकला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कनोन्गो यांनी यूट्यूबच्या भारतातील सार्वजनिक धोरण प्रमुखांना तत्काळ कारवाई करण्याची विनंती केली. शाेमध्ये पालकांबद्दल अश्लील भाष्य समय रैनाचा तरुण वर्गात लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा वादग्रस्त भाग ८ फेब्रुवारी रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाला. या शोमध्ये बोल्ड कॉमेडी कंटेंट आहे. या शोचे जगभरात ७३ लाखांहून अधिक फॉलोवर आहेत. या शोमध्ये रणवीर याने पालक आणि महिलांबद्दल अतिशय हीन दर्जाची टिप्पणी केली. त्यानंतर त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/0GdcOgs

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.