Type Here to Get Search Results !

महसूल क्रीडा स्पर्धेच्या विजयात‎अमरावतीने साधली हॅट््ट्रिक‎:महसूल संघाने तिसऱ्यांदा जिंकला विभागीय चषक‎

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेत‎अमरावतीच्या संघाने तिसऱ्यांदा विभागीय‎चषक जिंकून हॅट््ट्रिक साध्य केली आहे.‎अकोला येथील देसाई क्रीडा स्टेडियममध्ये ७‎ते ९ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव पार पडला.‎या स्पर्धेत येथील विभागीय आयुक्त‎कार्यालयासह पाचही जिल्हयातील‎अधिकारी-कर्मचाऱ्यांच ्या संघांनी सहभाग‎घेतला. दरम्यान दमदार प्रदर्शन करत‎अमरावतीने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली.‎ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखल्याने या‎वर्षीही अमरावतीच्या झोळीत विभागीय‎जेतेपदाची कमाई झाली. विशेष म्हणजे हे‎जेतेपद मिळवण्याची अमरावतीच्या संघाची ही‎तिसरी वेळ आहे.‎ सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्यासाठी‎जिल्ह्यातील बहुतेक अधिकारी, कर्मचारी यांनी‎सक्रिय सहभाग नोंदवला. दरम्यान जिल्ह्याला‎विजेतेपद मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी‎सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी सूरज‎वाघमारे व निवासी उपजिल्हाधिकारी अनिल‎भटकर यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक नीलेश‎खटके, तहसीलदार विजय लोखंडे, अन्य‎उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय‎अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार‎तसेच क्रीडा सचिव मुन्ना उर्फ महेंद्रसिंग‎ठाकूर, संघटनेचे जिल्हा सचिव रामानंद‎सरस्वती, इतर पदाधिकारी सुजित सरोदे,‎सागर बनसोडे, विवेक आकोलकर, दिनेश‎गवई, दीपक शिरसाट, वर्षा राठोड, सुनीता‎तिरमारे, रुपाली आंबेकर, माधुरी सगणे यांनी‎परिश्रम घेतले.‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/FJHyVUe

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.