गंगा नदीच्या पात्रात डुबकी मारली की आपली सर्व पापे धुऊन निघतात, अशी लाखो लोकांची श्रद्धा आहे. खरंच गंगा नदीचे पाणी इतके शुद्ध आहे का? असाही प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर शोधण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) शास्त्रज्ञांनी गोमुख ते गंगासागरदरम्यान गंगानदीपात्राचा अभ्यास केला. त्यांना या पाण्यामध्ये असे काही खास गुण आढळून आले, ज्यामुळे पात्रातील पाणी शुद्ध ठेवण्याची क्षमता गंगेतच असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. या टीमचे प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. कृष्णा खैरनार यांनी “दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाद्वारे निधी पुरवण्यात येणारा ‘नमामी गंगे’ प्रकल्पातंर्गत गंगा नदीच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी काम केले जाते. या अंतर्गत नदीच्या अद्वितीय स्वयंशुद्धीकरण गुणधर्मांचा अभ्यास करण्यात येत आहे. दीर्घकालीन पर्यावरणीय शाश्वततेसाठी गंगेच्या अद्वितीय आत्मशुद्धीकरण क्षमतेचे जतन करणे अत्यावश्यक आहे, असे खैरनार यांनी सांगितले. सध्या प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर महाकुंभ सुरू असून कोट्यवधी भारतीय गंगेत पवित्र स्नान करीत आहे. अशातच गंगा नदीच्या पाण्याचा दर्जा आणि प्रदूषणाचा मुद्दा वारंवार चर्चिला जातो. या पार्श्वभूमीवर नीरीचे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे. नीरीने डिसेंबर २०२४ मध्ये हा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. गंगेचे पाणी शुद्ध का असते?... जाणून घ्या शास्त्रज्ञांनी शोधलेली कारणे यमुना, नर्मदा नदीपात्रात शुद्धतेची क्षमता कमीच पहिला भाग गोमुख ते हरिद्वार, दुसरा भाग हरिद्वार ते पाटणा आणि तिसरा भाग म्हणजे पाटणा ते गंगा सागर असा होता. एकूण १५५ जागांवरील पाण्याचे नमुने घेण्यात आले. या अभ्यासात नीरीसह विविध आयआयटी, बनारस हिंदू विद्यापीठ सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचे सहकार्य घेतले. गंगेसोबत यमुना आणि नर्मदेच्या पाण्याचाही तसाच अभ्यास केला, मात्र पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, पाण्यात विरघळणारे टरपीन्स, बॅक्टेरियोफाज आणि सेडिमेंट या चारही गुणांच्या बाबतीत यमुना आणि नर्मदा हे नदीपात्र गंगेच्या तुलनेत खूपच मागे असल्याचे निरीला आढळले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PNhcduq
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:गंगेतच शुद्धतेची क्षमता म्हणून ती पवित्र, नीरीचा अभ्यास; उच्च ऑक्सिजन, पाण्यात विरघळणारे टरपीन्स, खास बॅक्टेरियोफाज, सेडीमेंट्स कारणीभूत
February 16, 2025
0