Type Here to Get Search Results !

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:न्यायाधीशांची निरीक्षण समिती असूनही भुमरेंना लागली होती घराची ‘लॉटरी’

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंंप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदिपान भुमरेंनीही रोहयो मंत्री असताना म्हाडाच्या फ्लॅटसाठी स्वत:ला अल्प उत्पन्न गटात (एलआयजी) दाखवले होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी त्यांच्या नावावर १.२१ कोटींची २ आलिशान घरे होती. तरीही त्यांनी म्हाडाला खोटी माहिती दिली. स्वत:चे मासिक उत्पन्न ५० हजार दाखवले. प्रत्यक्षात २०१९ व २०२४ च्या निवडणूक शपथपत्रात त्यांचे दरमहा उत्पन्न २.८९ लाख होते. सोडतीनंतर यादीत त्यांचे नाव आल्याने ते वादात अडकले. म्हणून त्यांनी पैसे भरले नाही. नुकतेच त्यांचे घर म्हाडाने यवतमाळातील पोलिस कर्मचाऱ्याला दिले. भुमरे २०१९ ला पैठणचे आमदार तर २०२४ ला खासदार झाले. ते एकूण ५ वेळा आमदार, २ वेळा मंत्री होते. त्यांनी शपथपत्रात ५.२४ कोटींची अधिकृत संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. तरीही ‘म्हाडा’च्या घरासाठी त्यांनी १० जून २०२२ रोजी अर्ज करताना २०२१-२२ चे मासिक ५० हजार, तर वार्षिक ६ लाख उत्पन्न दाखवले होते. चिकलठाण्याच्या गट क्रमांक ७०८ मधील ३९० सदनिकांचा हा प्रकल्प आहे. यात ‘एलआयजी’साठी सदनिका राखीव होत्या. त्या वेळी त्यांना आमदार म्हणून दरमहा २.३२ लाखांचे वेतन मिळायचे. २४ जून २०२२ रोजी सदनिकांची सोडत काढली, त्या वेळी भुमरे रोहयोमंत्रीच्या नात्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानंतर ते वादात अडकले होते. म्हणून त्यांनी म्हाडाचे घर घेणार नसल्याचे २६ जून २०२२ रोजी जाहीर केले होते. पण जानेवारी-२०२५ पर्यंत त्यांनी म्हाडाला घर नको असे कळवलेच नव्हते. ५.२४ कोटींची संपत्ती शपथपत्रानुसार भुमरेंचे पाचोडचे घर २८.४३ लाखांचे आहे. संभाजीनगरातील गारखेड्यात त्यांनी ४१३५.४९ चौरस फूटांचा अालिशान बंगला १४ ऑगस्ट २००८ रोजी खरेदी केला. आज त्याची किंमत १.२१ कोटी आहे. पत्नी पुष्पाकडे शेतीसह १.४० कोटींची संपत्ती आहे. दोघांची सुमारे ५.२४ कोटींची संपत्ती आहे. मुदतीत आले नाही अर्जादर विहित वेळेत आले नाही तर आम्ही दावा रद्द करतो. अगदी त्याचप्रमाणे संदिपान भुमरे आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागेवर आम्ही गरजवंतांची निवड केली आहे. म्हाडाची ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. -किशोर काटवटे, सीओ, म्हाडा मी भुमरेंची लोकपालांकडे तक्रार करणार आहे सरकारी योजनांसाठी गुन्हे दाखल नसावेत असाही नियम आहे. पण भुमरेंवर गंभीर स्वरूपाचे ९ फौजदारी गुन्हे आहेत. त्यात दरोड्याचाही (३९५) होता. त्यातून ते बाहेर पडलेत. तरीही म्हाडाने त्यांना पात्र कसे ठरवले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून कारवाईची अपेक्षा नाही. त्यामुळे मी भुमरेंची लोकपालांकडे तक्रार करणार आहे. - सुहास वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते थेट सवाल - खा.भुमरे मी अर्ज केला नाही, चुकून नाव आले आमदाराचे वेतन २.३२ लाख असताना तुम्ही ५० हजार दाखवले? मी अर्जच केला नव्हता. चुकून माझे नाव यादीत आले. दोन बंगले असताना मी अर्ज कसा करेन? शपथपत्रात वार्षिक उत्पन्न जास्त तरीही फ्लॅटसाठी ५० हजार दाखवले? माझे नाव यादीत आले असेल तर मी अधिकाऱ्यांना सांगून डिलीट करायला सांगतो. मला फ्लॅट नकोय. दोन घरे तरी म्हाडाला घर नसल्याचे का सांगितले? तेच सांगतोय. पाचोडचे घर वडिलोपार्जित आहे. संभाजीनगरचे माझे आहे. म्हणूनच अर्ज केला नाही.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MjUvi4o

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.