Type Here to Get Search Results !

संभाजीनगरातील ड्रग्ज रॅकेट उघड:पती जेलमध्ये असताना पत्नीकडून नशेचा बाजार

गुजरातहून अमली पदार्थ आणून शहरात विक्री केल्याप्रकरणी सराईत गुंड अजय वाहूळ ऊर्फ ठाकूर आणि त्याची पत्नी राणी या दोघांना अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेने अटक केली. सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी साताऱ्यातील साईनगर येथे त्यांच्या राहत्या घरावर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात एमडी ड्रग्जची पावडर, गांजा आणि नशेच्या गोळ्या असा सुमारे १ लाख ५ हजार ३८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुरतहून आयेशा नावाच्या महिलेकडून हा माल आणून शहरात विक्री करीत असल्याची कबुली आरोपी ठाकूर याने पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली ठाकूरच्या साताऱ्यातील घरावर हा छापा टाकण्यात आला. अजय ठाकूर हा कुख्यात गुंड सहा वर्षांपासून कारागृहात होता. त्या वेळी त्याची पत्नी अमली पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय सांभाळत हाेती. विशेष म्हणजे, माझा नवरा डॉन आहे असे धमकावत ती दादागिरी करायची. सुरत येथील आयेशा नामक महिलेकडून अमली पदार्थ आणून ते शहरात विकत असल्याची कबुली अजय याने दिली. सातारा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आठ जणांच्या टोळीवर गुन्हा अजय रमेश वाहूळ ऊर्फ ठाकूर, राणी ठाकूर, अनिल अंबादास माळवे, अरुण बाबूराव शिनगारे, संतोष राजू खरे, अशोक यमाजी भालेराव, दीपक चरणसिंग मलके आणि सुरत येथील आयेशा नामक महिलेवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुन्ह्यातील सर्वच आरोपी सराईत असून त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत अमली पदार्थ विक्री प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. आईची औषधे म्हणून सुरुवातीला कांगावा, निघाली एमडी ड्रग्जची पाकिटे पोलिसांनी सकाळी ७ वाजता अजयच्या साईनगरातील घरावर छापा घातला. या वेळी बेडरूम व बाथरूमला जोडून असलेल्या एका रूममधील टेबलवर चिलीम, सिगारेटचे तुकडे दिसले. ठाकूरच्या दुसऱ्या घरात लोखंडी कपाटात काही गोळ्या, गांजा आणि पावडरची पाकिटे दिसली. पोलिसांनी त्याबद्दल आरोपी ठाकूरची चौकशी केली असता आईची औषधे असल्याचा कांगावा केला. पोलिसांनी न्यायसहायक वैज्ञानिक पथकाच्या तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी केली असता त्या नशेच्या गोळ्या आणि एमडी ड्रग्जची पावडर असल्याचे समोर आले. ठाकूरच्या घरातून पोलिसांनी १ किलो ४३७ ग्रॅम गांजा, नशेच्या गोळ्यांच्या १६ स्ट्रिप्समधील १६० गोळ्या, ११ छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधील १०.६३ ग्रॅम एमडी ड्रग्ज यासह दोन मोबाइल असा सुमारे १ लाख ५ हजार ३८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NvDbJUH

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.