Type Here to Get Search Results !

खासगीतून घाटीकडे ढकललेल्या 34% गर्भवती पडतात मृत्युमुखी:16 ते 21 वयाच्या मातांचे अधिक मृत्यू

२०२३ व २०२४ साली प्रसूतीदरम्यान १३० मातांचा मृत्यू झाला. १६ ते ३९ वर्षीय मातांचा त्यात आहे. वर्ष २०२३ मध्ये माता मृत्यूचे सरासरी वय २६ होते. ते २०२४ मध्ये एक वर्षाने कमी होऊन २५ झाले. सर्वाधिक ३४ टक्के मृत्यू खासगी रुग्णालयांचे आहेत. जंतुसंसर्ग मृत्यूचे प्रमुख कारण असले तरी अतिरक्तस्रावाने मृत होणाऱ्या मातांचे प्रमाण ११ % आहे. घाटीत दरवर्षी १९,५०० प्रसूती होतात. त्यात दरवर्षी ६५ जणींचा मृत्यू होतो. हे प्रमाण निव्वळ ०.३३ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटीत) वर्षाकाठी ६५ मृत्यू होतात. डिसेंबर २०२३ मध्ये सर्वाधिक ८ मातांचा मृत्यू झाला, तर फेब्रुवारी, मार्च आणि जूनमध्ये प्रत्येकी ७ जणींचा मृत्यू झाला. महिन्याला सरासरी ५ महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२४ मधील एप्रिल, ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्येही प्रत्येकी ७ माता दगावल्या. १८ ते ३९ वर्षांच्या मातांचा २०२३ दरम्यान मृत्यू झाला, तर २०२४ मध्ये १६ ते ३९ वर्षांपर्यंतच्या गर्भवतींचा मृत्यू झाला. सरासरी मृत्यूचे वय २५ ते २६ आहे. २०२३ दरम्यान १९,५०० प्रसूती झाली. त्यापैकी ६५ जणींचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण ०.३३ टक्के आहे. २०२४ मध्ये हेच प्रमाण ०.३४ टक्के झाले आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण हवे जंतुसंसर्गाचे मृत्यू अधिक सर्वाधिक मातांचा मृत्यू जंतुसंसर्ग झाल्यामुळेच ओढ‌वला आहे. त्याचे प्रमाण ३२ टक्के आहे. उच्च रक्तदाबामुळे २६ टक्के माता दगावतात. प्रसूतीदरम्यान ११ टक्के मातांचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू होतो, तर इतर कारणांनीही गर्भवती आपला जीव गमावून बसतात. डॉ. विजय कल्याणकर, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर ऐनवेळी गुंतागुंत वाढते, मग रेफर होतात गर्भवती माता मृत्यूचा दर शून्य करण्यासाठी प्रयत्नशील प्रसूतीच्या तुलनेत माता मृत्यूंचे प्रमाण नगण्य आहे. क्रिटिकल झाल्यानंतरच पेशंट घाटीत रेफर हेतात. तरीही प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. समाजाच्या संघटित प्रयत्नांनी या मोहिमेत लवकर यश येईल. -डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, घाटी, छत्रपती संभाजीनगर

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/jgIaJFp

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.