Type Here to Get Search Results !

मुंबईत गोरेगाव येथील फिल्म सिटीजवळ भीषण आग:अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक झोपड्या जळून खाक

मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटी शेजारील नागरमोडी पाडा येथील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्व भागातील संतोष नगर भागात ही भीषण आग उसळली आहे. सायंकाळी 7.30 च्या सुमारास ही आग लागली असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या संतोष नगर परिसरात दाखल झाल्या असून आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे व सध्या कूलिंगचे काम सुरू आहे. गोरेगाव येथे लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. संतोष नगर भागातील घरांमध्ये असलेल्या सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होत गेले आणि आग झपाट्याने वाढत गेली. या आगीत अनेक झोपड्या जाळून खाक झाल्या असल्याचे समजते. आग लागल्याचे समजताच येथील नागरिक तातडीने बाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेले आहे. घटनास्थळी गरज लागल्यास एक रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/87KzG2y

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.