Type Here to Get Search Results !

हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांना उद्योगाचे प्रशिक्षण:लक्ष प्रतिष्ठानच्या वतीने विविध गावांत उपक्रम

लक्ष प्रतिष्ठानच्या वतीने संक्रांतीनिमित्त सुरेखा ठाकरे यांच्या मार्गदर्शनात विविध गावांमध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अंतर्गत चांदूर बाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथे संक्रांतीनिमित्त महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित महिलांना विविध उद्योगाचे मार्गदर्शन करण्यात आले. गावातील कष्टकरी सर्वसामान्य महिलांनी वेळोवेळी सुरेखा ठाकरे यांच्याकडे उद्योग निर्मितीची मागणी केलेली होती. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा उद्योग केंद्राचे मार्गदर्शक नेत्रदीप चौधरी यांनी विविध उद्योगाबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी गावपातळीवर उपलब्ध असलेल्या विविध कच्च्या मालापासून उद्योग निर्मितीकरिता आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्र, ग्रामोद्योग केंद्र व विविध शासकीय योजनांमधून उपलब्ध अनुदानाविषयी माहिती देण्यात आली. पारंपरिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र येत विविध उद्योग सुरू करण्याविषयी संकल्प केला. या कार्यक्रमासाठी शोभना देशमुख, सुषमा बर्वे, अनुश्री निखिल ठाकरे, रंजना पाथरे, वनिता धरपाल, शुभांगी ठाकरे, वैशाली विधळे, ग्रा. पं. सदस्य वंदना चौधरी, अर्चना वानखडे, शारदा विधळे, सुषमा मेश्राम, मीनल पाथरे, ज्योत्स्ना ठाकरे, ममता हिवसे, बबिता मेश्राम, गायत्री ठाकरे, शारदा भोकरे, संध्या पाथरे, छोटी सोलव, प्रतिभा घावट, चंदा नवले, मीना ठाकरे, हरीदिनी नवले, अनिता सुळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PI0frkY

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.