मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असलेल्या अजिंठा डाेंगरात वसंत ऋतूमध्ये विविध फुले फुलली आहेत. घाटातून जाताना दाेन्ही बाजूचे डाेंगर फुलांनी बहरले आहेत. काही वर्षांपूर्वी डाेंगरातील जमिनीची धूप थांबवण्यासाठी वन विभागाने डाेंगरावर गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया सेपियम) ही विदेशी झाडे लावली हाेती. गेल्या दहा वर्षांत संपूर्ण डाेंगररांगेत या झाडांचा प्रसार झाला आहे. दाट पाने असलेल्या या झाडाला स्थानिक भाषेत उंदीरमारी असेही म्हटले जाते. मूळचे उत्तर अमेरिका, मेक्सिकाे येथील प्रजातीचे हे झाड १० फुटांपासून ४० फुलांपर्यंत वाढते. वसंत ऋतूमध्ये या झाडांना सर्वात प्रथम फुले येतात. फुलांचा कालावधी तीन आठवडे ते एक महिन्यापर्यंत असताे. सध्या संपूर्ण अजिंठा डाेंगर या फुलांमुळे आकर्षित दिसताे आहे. गुलाबी, जांभळा, पांढऱ्या आणि पिवळ्या छटा असलेली ही फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. राखीव जंगलात ३०० हेक्टरवर केली लागवड अजिंठा राखीव जंगलात ३०० हेक्टरवर यांची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला या झाडांची अजिंठ्याच्या राखीव जंगलातच लागवड करण्यात आली होती. आता ही झाडे कन्नड, सोयगाव, चाळीसगाव जंगलातही लावण्यात आलेली आहेत. या झाडाची फांदी तोडून लावली तरीही ती उगवते. विशेष म्हणजे कमी पाण्यात झाड जगते. खडक, मातीमिश्रित व खडकाळ जागेतही उगवते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wmdQH4y
वसंत बहरला... अजिंठा घाटात गिरीपुष्पांमुळे जणू कॅलिफाेर्नियाचीच अनुभूती:जमिनीची धूप थांबवण्यासाठी लावली अमेरिकी प्रजातीची झाडे
February 09, 2025
0