महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अंदाजित १२ कोटी ८३ लाख असून २०२४ च्या आकडेवारीनुसार राज्यात प्रत्यक्ष पोलिस संख्याबळ १ लाख ९८ हजार ८७० आहे. म्हणजेच १ लाख लोकसंख्येमागे १७२ पोलिस आहेत, तर महिला पोलिसांची संख्या ३६ हजार ९ एवढी असून एकूण उपलब्ध पोलिस संख्या बळाच्या तुलनेत महिला पोलिसांचे प्रमाण १८.११ टक्के इतकेच आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत “समर्थन अर्थसंकल्प अभ्यास केंद्र’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. नागपूरमधील दंगलीनंतर, पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या आणि अर्थसंकल्पात गृह विभागासाठी केलेल्या तरतुदीबद्दलचा हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात १ लाख ८७ हजार ९३१ पोलिस कार्यरत असून त्यापैकी महिलांची संख्या ३१ हजार २२३ इतकी आहे. एकूण पोलिसांच्या प्रमाणात १६.६१% इतके कमी आहे. राज्यात महिलांची संख्या ६ कोटी १६ लाख असून त्याप्रमाणात महिलांची भरती पोलिस विभागात होणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा सुधारित अंदाज अधिक सन २०१७-१८ ते सन २०२३-२४ या ७ वर्षाच्या कालावधीत एकाही वर्षात गृह विभागाला प्रत्यक्ष खर्चासाठी सुधारित अंदाजाच्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला नाही, अशी टिप्पणी “समर्थन-अर्थसंकल्प अध्ययन केंद्रा’ ने गृह विभागाबाबत केली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: हा विभाग सांभाळत आहेत. सन २०१७-१८ ते २०२३-२४ या ७ वर्षाच्या कालावधीत सन २०२१- २२ आणि २०२२-२३ या दोन वर्षात अर्थ संकल्पीय अंदाजाच्या तुलनेत अधिक खर्च झाला तर सन २०२३-२४ मध्ये पुन्हा अंदाजित निधीच्या तुलनेत ३ हजार ७३८ कोटी निधी कमी उपलब्ध झाला. म्हणजेच ३१ हजार ७६१ कोटी निधीच खर्च करण्यात आला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Dy6CaYG
एक लाख लोकसंख्येमागे महाराष्ट्रात 172 पोलिस:महिला पोलिसांची संख्या 16.61 टक्के कमी
March 20, 2025
0