विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेत्यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडत त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात ५ मार्चला नियमाप्रामाणे प्रस्ताव दिला होता. मात्र, सभापतींनी मंगळवारी तो फेटाळला. बुधवारी कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींवर विश्वास प्रस्ताव ठेवला. तसेच विरोधी पक्षनेत्याला आपली भूमिका मांडू दिली नाही. दरम्यान, प्रचंड गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. सभागृहात सरकार, सभापतींविरोधात घोषणाबाजी सभापतींचा धिक्कार असो, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी, लोकशाहीचा खून करणाऱ्या सभापतींचा धिक्कार असो, प्रवीण दरेकरांचा धिक्कार असो, न्याय द्या, लोकशाहीला न्याय द्या, लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणाबाजींनी विरोधकांनी १ तास सभागृह दणाणून सोडले. आज काळ्या फिती लावून सहभागी होणार गदारोळामध्येच महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. तसेच याचा निषेध म्हणून गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार आहेत. उपसभापती डायसवर बसल्यास कामकाजात सहभागी होणार नसल्याची माहिती दानवे यांनी दिली. एक प्रकारे सत्ताधारी पक्षाला पाशवी बहुमताचा माज चढला आहे. त्यांनी विरोधकांची भूमिका मांडू न देता प्रस्ताव रेटून नेला, त्याला आम्ही विरोध केला, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या वेळी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/kQoXJsR
पक्षपाती कामकाजाचा आरोप; सभापती शिंदेंना पदावरून हटवा:गोंधळामुळे 2 वेळा विधान परिषद तहकूब
March 19, 2025
0