मंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी सकाळी आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाणे गाठले. एक मंत्री, खासदाराच्या मुली जेथे सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांचे काय? असे वारंवार सांगून संताप व्यक्त केला. केंद्रीय मंत्री व खासदार म्हणून नाही तर एक आई म्हणून न्याय मागण्यासाठी आपण पोलिस ठाण्यात आलो आहोत. या संदर्भात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे करणार आहोत. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बोलले आहे, असे त्यांनी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांना सांगितले. महाराष्ट्रात महिला व मुली सुरक्षित नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात पहाटेच्या वेळी युवतीवर बलात्काराची घटना घडली. आता जळगाव जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह तिच्यासोबत असलेल्या तीन-चार मुलींची ७ टवाळखोरांनी छेड काढल्याचे उघडकीस आले. मुुक्ताईनगरमध्ये यात्रेत हा प्रकार घडला. बदनामीच्या भीतीने अनेक पालक अशा टवाळखोरांविरोधात तक्रार देत नाहीत म्हणून त्यांचे धाडस वाढते. पण रक्षा खडसे यांनी मात्र कशाचीही भीडभाड न ठेवता रविवारी स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.उर्वरित. पान ५ पोलिसांनी २ तास बसवून ठेवले, म्हणाले- तक्रारीचा फेरविचार करा हे आरोपी शिंदेसेनेशी संबंधित आहेत. काहींवर तर आधीच गंभीर गुन्हे आहेत. या गुंडांच्या भीतीपोटी अनेक मुली तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. शाळा, महाविद्यालये, बसस्थानकात गावगुंडांचा प्रचंड हैदोस आहे. राजकीय पाठबळ व संरक्षण असल्यामुळेच त्यांची मुजोरी वाढली आहे. आम्ही मुलींना धीर देऊन तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात गेलाे तर तिथे आम्हाला दोन तास बसवून ठेवले होेते. मुलीचे प्रकरण आहे, तक्रार द्यायची की नाही विचार करा, असे पोलिसच सांगत होते. - एकनाथ खडसे, माजी महसूलमंत्री आरोपी विशिष्ट पक्षाचे, तरी माफी नाही "छेडछाड करणाऱ्यांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यापैकी काहींना अटक केलेली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. आरोपींवर कडक कारवाई होईल.’ - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री पुणे... स्वारगेट बलात्कार घटना ताजी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात पहाटे सहाच्या सुमारास एका नराधमाने एका तरुणीने बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. हा तरुणाने अनेक मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचेही चौकशीत समोर आले. नाशिक... प्रियकराने मोडला तरुणीचा संसार गणेशवाडी येथे पतीच्या मित्राकडून विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी करत अत्याचार करण्याचा प्रयत्न, तर पंचवटीत प्रियकराने विवाहितेचे पूर्वीचे फोटो पतीला पाठवून १३ वर्षांचा संसार मोडला. प्रियकरावर गुन्हा. घटनाक्रम ... टवाळखोरांनी मुलींना छेडले, मोबाइलमध्ये व्हिडिओही काढले एकतर्फी प्रेमातून तरुणीसह आईला मारहाण; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल एकतर्फी प्रेमातून तरुणी व तिच्या आईला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. २१ वर्षांच्या तरुणीला लग्नासाठी साकडे घातले, मात्र तिने दिलेला नकार पचवता न आलेल्या एका प्रियकराने हा प्रताप केला. ही घटना गंगापूर तालुक्यातील एका गावात शनिवारी घडली. वाळूज पोलिस ठाण्यात आरोपी नारायण दत्तात्रेय चनघटे याच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी नारायणने मुलीच्या घरात प्रवेश करून ‘तू माझ्याशी का बोलत नाही? मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,’ अशी गळ घातली. मात्र तरुणीने नकार दिल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने तिचा उजवा हात धरून शिवीगाळ करत मारहाण केली. आराेपी शिंदेसेनेशी संबंधित; दाेन अटकेत आरोपी अनिकेत भोई हा शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय उपजिल्हाप्रमुख छोटू भाेईचा पुतण्या आहे. त्याच्यावर आधीचे ४ गुन्हे आहेत. माजी नगरसेवक पीयूष मोरे (भाजपमधून शिंदेसेनेत), अनुज पाटील, चेतन भोई, युवा सेना शहरप्रमुख सचिन पालवे, किरण माळी व एका अल्पवयीनचा समावेश. किरण माळी व एक अल्पवयीनास अटक केली. ५ जण फरार. खडसेंना आमचेच लोक दोषी दिसतात खडसे आणि आमच्यात ३० वर्षांपासूनचे ‘सख्य’ आहे. काहीही घडले की त्यांना आमचेच कार्यकर्ते दिसतात. या प्रकरणाची चौकशी करून जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. - चंद्रकांत पाटील, शिंदेसेनेचे आमदार उदगीर ... वसतिगृहात ३ विद्यार्थिनींचा छळ जयहिंद पब्लिक स्कूल या संस्थेमार्फत शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने मुलींना निवासी शिक्षण देण्यात येते. या संस्थेच्या वसतिगृहातील तीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना रविवारी समोर आली. याप्रकरणी संस्थेचा शिपाई मुरली देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/8RKMzWU
मुलींची रक्षा धाेक्यात:केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह 3 मुलींची मुक्ताईनगरच्या यात्रेत गुंडांकडून छेडछाड
March 02, 2025
0