Type Here to Get Search Results !

बोगस 49 शिक्षकांना 50 हजार पगार; नाशिकच्या लेखाधिकाऱ्यावर गुन्हा:जळगावची संस्था व मुख्याध्यापकांच्या संगनमताने अपहार

जळगाव जिल्ह्यात १० शिक्षण संस्थांत शिक्षकांची बोगस भरती करत तेथील ४९ शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यात आले. तसेच दरमहा ५० हजार रुपये वेतन शासन तिजोरीतून देण्यात आले. याप्रकरणी दीड लाख रुपये वेतन असलेल्या नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई व जळगाव माध्यमिक वेतन पथकाचा अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्यावर गुरुवारी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘दिव्य मराठी’ने २० मार्चच्या अंकात बातमी प्रकाशित करून हे प्रकरण उघडकीस आणले होते. पदाधिकारी, मुख्याध्यापक यांच्यासोबत संगनमत करून ही फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे. रामकृष्ण अभिमन पाटील यांनी शिक्षण आयुक्तांकडे या बोगस शिक्षकांबाबत तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्तांनी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांना प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सांगितले होते. अधिकाऱ्यांनी पुरावे न तपासता शालार्थ आयडी कोड दिला शालार्थ आयडी कोडसाठी वित्त अधिकाऱ्यांनी पुरावे न तपासता तो दिला. वेतन पथक अधिकाऱ्यानेही काहीही न बघता पगार सुरू केला. म्हणून दोन्ही अधिकाऱ्यांवर आ​​​​​​​रोप निश्चित करून तक्रार दिली. सध्या अंदाजे ४९ जणांचे कोड जनरेट केल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले आहे, पण ही संख्या निश्चित नाही. ती वाढू शकेल. - भाऊसाहेब चव्हाण, विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक वरिष्ठ स्तरावर चौकशी या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चाैकशी झालेली होती. प्रकरणात माध्यमिक शिक्षण विभागाकडे काेणताही पत्रव्यवहार किंवा माहिती आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत काहीही सांगता येणार नाही असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले होते. या संस्थांत दिले बोगस शालार्थ आयडी

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/P0R5cV8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.