Type Here to Get Search Results !

वाघ्याच्या समाधीसाठी समिती स्थापन करा- भूषणसिंह होळकर:रायगडावरील समाधी हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक

रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे तसेच संभाजी ब्रिगेडने ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही ही समाधी उखडून टाकू, असा इशारा ब्रिगेडने दिला आहे. त्यावर अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर म्हणाले की, यासंदर्भात समिती स्थापन करून मगच निर्णय घ्यावा. भूषणसिंहराजे की, लोकांच्या प्रश्नापेक्षा या विषयांवर भर दिला जात आहे. यातून समाजातून तेढ निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीच्या नव्हे कर्तृत्वाच्या जोरावर माणसे निवडली होती. जातीच्या जोरावर निवडली नव्हती. वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी सरकार, भारतीय पुरातत्त्व विभागाने इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी. यात राजकारणातील कुणालाही घेऊ नये. समितीने दोन्ही बाजू समजून घेऊन भूमिका घ्यावी. होळकर घराणे इंग्रजांना घाबरत होते, असे वक्तव्य काल एकाने केले, असे सांगत भूषणसिंहराजे म्हणाले की, होळकरांनी कधीही इंग्रजांशी तह केला नाही. अजिंक्यतारा किल्ल्यावर कैदेत असलेल्या साताऱ्याच्या छत्रपतींना सोडवण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकरांनी पुढाकार घेतला होता. तुकोजी होळकरांनी शिवसमाधीसाठी निधी दिला. त्या वेळी महात्मा फुले, टिळक किंवा तुकोजी महाराजांनी जातीचा विचार केला असता तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का? मग आज आपण जातीच्या चष्म्यातून या सगळ्यांकडे का पाहतो? त्या वेळी छत्रपती घराणे अस्तित्वात होते, त्यांनी शिवसमाधीसाठी काय भूमिका घेतली, हे पण पाहिले पाहिजे, असेही भूषणसिंहराजे यांनी नमूद केले. इतिहासात पुरावे, वाघ्याचे शिल्प हटवू देणार नाही : लक्ष्मण हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, इतिहासात वाघ्याचे पुरावे आहेत. २०१२ ला संभाजी ब्रिगेडने काढलेला वाघ्याचा पुतळा तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुन्हा बसवला होता. संभाजी ब्रिगेड, संभाजी भोसलेंनी सुरू केलेल्या उपद्व्यापाला धनगर समाजाचा विरोध आहे. ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंतीदिनी अहिल्याबाईंच्या गावी पंतप्रधान मोदींना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मग संभाजी भोसलेंनी ३१ मे तारखेचाच अल्टिमेटम का दिला? उद्धवसेनेचे खा. संजय राऊत म्हणाले की, संभाजीराजे आणि मनोहर भिडेंनी एकत्र बसून वाघ्या कुत्र्याबाबत निर्णय घ्यावा.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MGfxodc

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.