स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एका गाण्यामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टिप्पणी केली होती. एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड देखील केली. यानंतर कुणाल कामराने तोडफोडीचे व्हिज्युअल्स वापरत त्याचे जुने गाने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणालचा तो व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. कुणाल कामराच्या गाण्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. दुसरीकडे मी कुणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही. अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्याविषयी जे म्हणाले होते, तेच मी म्हणालो. मी कुणाचीही माफी मागणार नसल्याचे कुणालने म्हटले आहे. या सगळ्यानंतर आता संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कुणाल कामरा गाणे म्हणताना दिसत आहे. तर संजय राऊत यांनी या पोस्टला ये तो अपुन के जैसा निकला, झुकेगा नहीं साला! जय महाराष्ट्र! असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग केले आहे. संजय राऊत यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी पोस्ट शिंदेंबद्दल केलेले वक्तव्य तेव्हा योग्य होते - अजित पवार दरम्यान, अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्याविषयी जे म्हणाले होते, तेच मी म्हणालो, असे कुणाल कामरा म्हणाला होता. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होत, आज ते वक्तव्य बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. मागच्या काळात मी विरोधी पक्षनेता होतो, त्यावेळी मी परिस्थितीला अनुसरून बोललो. त्यानंतर आम्ही आता निवडणुकीला सामोरे गेलो, लोकांनी आम्हाला त्यांचा सपोर्ट दिला आहे. आम्हाला मताधिक्य दिले आहे. आता मागच्या गोष्टींबाबत बोलले जाते, पण आम्ही आज एकत्रित काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होते, आज ते वक्तव्य बरोबर नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Fic1N6E
ये तो अपून जैसा निकला, झुकेगा नही साला!:संजय राऊतांनी कुणाल कामराचा व्हिडीओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंना डिवचले
March 25, 2025
0