Type Here to Get Search Results !

टोंगलाबाद फाट्यावर चारचाकीवर हल्ला:हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून खामगावच्या देशमुख कुटुंबातील चौघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीर

दर्यापूर येथील टोंगलाबाद फाट्याजवळ सोमवारी संध्याकाळी एका कुटुंबावर दहशतवादी हल्ला झाला. खामगावचे देशमुख कुटुंब सोयरीक कार्यक्रम आटोपून वडनेर गंगाई येथून परतत असताना ही घटना घडली. काळ्या रंगाच्या एमएच-१४ एल-१८०७ या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना टोंगलाबाद फाट्याजवळ ४-५ अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून या तरुणांनी वाद घातला. त्यापैकी दोघे मोटरसायकलवर होते तर इतर तेथेच उभे होते. सुरुवातीला वाद घालून नंतर या टोळक्याने लाकडी दांडे आणि दगड वापरून गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर कारमधील प्रवाशांवर हल्ला केला. या हल्ल्यात संकेत देशमुख, मिलिंद देशमुख, गुणवंतराव देशमुख आणि श्याम देशमुख जखमी झाले. हल्लेखोरांनी पैशांची मागणी करत मोबाईल हिसकावून घेतला. मात्र संकेत देशमुख यांनी झटापटीत मोबाईल परत मिळवला. जखमी कुटुंबीयांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ठाणेदार सुनील वानखडे यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर पोलीस पथक हल्लेखोरांचा शोध घेत आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NJWrMk8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.