राज्यातील वातावरणात दररोज कमालीचा बदल होत आहे. साेमवारी वाऱ्याची द्राेणीय रेषा विदर्भ व मराठवाडामार्गे जातेय. त्यामुळे काेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील तीन-चार दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता अाहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी सांगली, साेलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव येथेही तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता अाहे. विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया येथे पुढील दाेन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे या जिल्ह्यांना यलाे अर्लट देण्यात अाला अाहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील उर्वरित भागातील तापमानात माेठा बदल हाेणार नाही. परंतु पावसाळी वातावरण निवळल्यानंतर तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता अाहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकणात कमाल तापमान वाढेल, असा अंदाज आयएमडीने दिला. आहे. गेले काही दिवस अनेक भागात दुपारनंतर पाऊस अथवा ढगाळ हवामान राहत असल्याने कमाल तापमान घटले होते. देशामध्ये परतलेली उष्णतेची लाट कायम राहणार देशात उष्णतेची लाट परतली असून राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या भागातील तापमानात वाढ होत आहे. पुढील काही दिवस हा प्रकोप कायम राहणार आहे. हिमालयात नवीन पश्चिमी विक्षोभ धडकणार असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/VO5vqBS
विदर्भ-मराठवाड्यासह कोकणात पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता:उर्वरित महाराष्ट्रात हवामान काेरडे राहील; हवामान खात्याचा अंदाज
April 14, 2025
0