Type Here to Get Search Results !

जैन समाजाच्या रोषापुढे मुंबई मनपा नमली; पूर्वीच्या ठिकाणी मंदिर होणार:विलेपार्लेचे मंदिर पाडणाऱ्या सहायक आयुक्तांची बदली

विलेपार्ले (पूर्व) येथील २७ वर्षे जुने श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्यात आले. ते त्याच ठिकाणी पुन्हा बांधण्यास महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तोंडी संमती दिली आहे. यासोबतच जैन समाजाच्या १० हजारांहून अधिक लोकांच्या अहिंसा रॅलीपुढे महापालिका प्रशासन नमले आणि सहायक महापालिका आयुक्त नवनाथ घाडगे पाटील यांची के-पूर्व प्रभागातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्वप्नंज क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ वर्षांपूर्वी बांधलेले श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी जैन समाजाच्या १० हजारांहून अधिक लोकांनी अहिंसा रॅली काढली. अहिंसा रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांनी तब्बल ४ किमी २ तास पायी चालत अंधेरी (पूर्व) येथील सहायक महापालिका आयुक्त कार्यालय गाठून निषेध व्यक्त केला. स्थानिक खासदार वर्षा गायकवाड (काँग्रेस) आणि स्थानिक आमदार पराग अलवाणी (भाजप) हे जैन समुदायासह येथे उपस्थित होते. २७ वर्षे जुने जैन मंदिर का पाडण्यात आले, असा खडा सवाल गायकवाड आणि अलवाणी यांनी सहायक महापालिका आयुक्त पाटील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायद्याचे पालन करत जैन मंदिर पाडले. त्यामुळे उपस्थित लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. कारण पाटील जैन मंदिराचा मलबा काढून त्याच ठिकाणी पुन्हा पूजा करण्याची परवानगी देण्यास नकार देत होते. युती सरकारच जबाबदार विलेपार्ले पूर्व येथील दिगंबर जैन मंदिर प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता मनपा अधिकाऱ्यांनी मंदिर जमीनदोस्त केले. जैन मंदिर पाडताना जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी आणि पुरातन ग्रंथ आणि धर्मग्रंथांचाही घोर अपमान करण्यात आला. हा पूर्वनियोजित कट असून भाजप युतीचे ‘बुलडोझर सरकार’च त्यास जबाबदार आहे. - वर्षा गायकवाड, खासदार लवकरच शेड तयार होणार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विलेपार्ले येथील चारही जैन समुदायांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे की, त्याच ठिकाणी जैन मंदिर पुन्हा बांधले जाईल. सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून अभिषेक व पूजा टीनच्या शेडमध्ये करण्यात येणार आहे. भाविकांसाठी लवकरच हे शेड तयार केले जाईल. - श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uGQmZTD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.