केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जानेवारीमध्ये शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्रातील प्राथमिक सदस्यता मोहिमेच्या संथगतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता मंडल अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा वेग वाढला आहे. भाजप राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) सांसद अरुण सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, पक्षाच्या ७० टक्के बूथ समित्यांचे गठण झाले असून २२ एप्रिलपर्यंत १ लाखपर्यंत बूथ समित्या गठण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष चव्हाण म्हणाले, जानेवारी २०२५ पासून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणीचे दीड कोटीचे लक्ष्य साध्य केले. आतापर्यंत जवळपास १ लाख ४० हजार सक्रिय सदस्य झाले असून ३ लाख सक्रिय सदस्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहोत. २० एप्रिल रोजी राज्यातील सर्व म्हणजे ११९६ मंडल अध्यक्षांची निरीक्षकांच्या देखरेखीत निवडणूक होणार आहे. मंडल अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्यानंतर २२ एप्रिलपासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती आली. दरम्यान, दीड कोटी प्राथमिक सदस्य बनवण्याच्या उद्दिष्टापैकी फक्त ४० लाख सदस्यच सदस्य झाले होते. यानंतर भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनीही वेळोवेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना सदस्यता मोहिमेचा वेग वाढवण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. राज्यात महायुतीचे सरकार असूनही महाराष्ट्रात भाजपला दीड कोटी सदस्यांची नोंदणी करता आली नाही. अध्यक्ष ४५ वर्षांचा हवा भाजपचे राष्ट्रीय सचिव व खासदार अरुण सिंह म्हणाले की, नवीन मंडल अध्यक्षांचे वय ३५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असेल. कुठेतरी एससी-एसटी समाजाचा विभागीय अध्यक्ष असेल तर त्याला वयोमर्यादेत थोडी सूट मिळेल. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, जिल्हाध्यक्षांचे वयदेखील याच मर्यादेच्या आसपास असेल.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/sfqgrw5