Type Here to Get Search Results !

नांदेडमधील बोरगावची घटना; तिसरा भाऊ जखमी‎:वादळात मंडपाचा तारेला ‎स्पर्श; दोघे चुलतभाऊ ठार‎

लोखंडी लग्न मंडपाला पडदे बांधत ‎‎असताना अचानक आलेल्या‎वादळामुळे मंडप उडाला. त्यामुळे‎वर असलेल्या उच्चदाब‎वीजवाहिनीला मंडपाचा स्पर्श‎झाला. या घटनेत मंडप बांधण्याचे‎काम करणाऱ्या ५ कामगारांपैकी‎तिघांना विजेचा धक्का लागून ते‎खाली पडले. त्यातील दोघा ‎‎चुलतभावांचा मृत्यू झाला तर तिसरा ‎‎गंभीर जखमी झाला. जखमीवर‎हदगाव येथील उपजिल्हा‎रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही ‎‎घटना रविवारी (२० एप्रिल)‎मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास‎बोरगाव (ता.हदगाव) येथे घडली.‎या घटनेत पांडुरंग भट्टेवाड (२४)‎आणि साईनाथ भट्टेवाड (२३) यांचा‎मृत्यू झाला, तर शिवप्रसाद भट्टेवाड‎याच्यावर उपचार सुरू आहेत.‎ बोरगाव (ह) येथील प्रकाश शिंदे‎यांच्या मुलीचे रविवारी लग्न होते.‎लग्नासाठी लोखंडी पाइपांचा मंडप‎टाकण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू‎होते. त्याचवेळी अचानक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सोसाट्याचा वारा सुटल्याने अर्धवट‎अवस्थेत बांधलेला मंडप उचलला‎गेला. वर असलेल्या उच्चदाब‎वीजवाहिनीला मंडपाचा स्पर्श‎झाला. त्यामुळे मंडपाला पकडून‎ठेवणाऱ्या ५ जणांना शॉक लागला.‎सर्वांना तातडीने रुग्णालयात‎हलवले, दोघांना मृत घोषित केले.‎ दोघांचे मृतदेह आणले‎ महावितरण कार्यालयात‎ शवविच्छेदनानंतर मृतदेह संतप्त‎नातेवाइकांनी महावितरणच्या‎कार्यालयात आणले. ग्रामपंचायत‎कार्यालयाने अनेकवेळा ठराव‎घेऊनही गावातील ११ केव्ही क्षमतेची‎उच्चदाब वीजवाहिनी ग्रामपंचायत‎आणि सोसायटीच्या प्रांगणातून‎महावितरणने हटवली नाही, असा‎आरोप केला.‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/e5ZmLpl

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.