Type Here to Get Search Results !

फार्म हाऊसवर धाड रोखण्यासाठी मदतीचा केला होता बनाव:भुजबळांना 1 कोटी रुपयांची खंडणी मागणारा गजाआड

आमदार छगन भुजबळ यांना तुमच्या त्र्यंबकेश्वरच्या फार्म हाऊसवर माल असून तेथे इनकम टॅक्सची रेड पडणार आहे. मी त्याच विभागाचा अधिकारी असून मला एक कोटी द्या, मी तुमची मदत करतो. मोबाईलवरुन अशी खंडणी मागणाऱ्या पेठमधील भामट्यास नाशिक पोलिसांनी वेशांतर करुन पेठमधील करंजाळी येथे बेड्या ठोकल्या. राहुल दिलीप भुसारे (२७, रा. कंरजाळी, ता. पेठ, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. भुजबळ यांनी आपला मोबाईल क्रमांक स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्याकडे डायव्हर्ट केला आहे. या मोबाइलवर २३ एप्रिलला अनोळखी फोन आला व खंडणीची मागणी करण्यात आली. भुजबळांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना माहिती दिली. पोलिसांनी गायकवाड यांना संबंधिताचा फोन आला तर बोलणे सुरुच ठेवा व पैसे देण्याची तयारी दाखवा असे सांगत सापळा रचून आरोपीस जेरबंद केले. पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपआयुक्त प्रशांत बच्छाव, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. भामटा बीएस्सी, हॉटेल अलिशान करायचे होते, दोघांच्या गप्पा ऐकून रचला कट: संशयित भुसारे बीएस्सी झालेला आहे. पेठमध्ये त्याचे हाॅटेल आहे. आर्थिक अडचणीमुळे त्याचे हाॅटेल चालत नव्हते. जानेवारीत त्याच्या हाॅटेलमध्ये दोन अनोळखी व्यक्तींच्या गप्पा रंगल्या होत्या. मंत्र्यांकडे खूप पैसा असतो. अल्पावधीतच ते मालोमाल होतात. ईडी, इनकम टॅक्सच्या म्हणूनच त्यांच्यावर धाडी पडतात. भुजबळांचेही नाव त्यांच्या चर्चेत आले. त्यानंतर संशयिताला भुजबळांना इनकम टॅक्स अधिकारी असल्याचे भासवून खंडणी मागण्याची शक्कल सुचली. सोशल मीडियावर त्याने संपर्क क्रमांक शोधून फोनाफोनीस सुरुवात केली. १०० कोटी खंडणी मागून भुसारेला आर्थिक अडचणीत सापडलेले हॉटेल आलिशान बनवायचे होते. १० अधिकाऱ्यांचे प्रत्येकी २० लाख आरोपी राहुल भुसारे याने २३, ३० एप्रिल आणि १२ ते १६ मे असे सलग सात दिवस गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. १० इनकमटॅक्स अधिकाऱ्यांचे प्रत्येकी २० लाख असे १०० लाख द्यावे लागतील असे सांगत खंडणी मागितली. भुसारे याने त्याच्या स्वत:च्या मोबाईल नंबरहून फोन न करता हाॅटेलमधील ग्राहक, ट्रक चालक, दुकानदारांच्या मोबाईलहून फोन करत दिशाभूल करत खंडणी मागितली. पण तेथेच तो अधिक फसत गेला. ज्या नंबरहून फोन आले त्यावरुन माहिती मिळवत सापळा रचला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. चिल्ड्रन बँकेच्या नोटा बॅगेत भरल्या पोलिसांनी भुजबळांकडील नरेंद्र सोनवणे या व्यक्तीकडे चिल्ड्रन बँकेच्या डमी नोटांची बॅग दिली. त्यात काही खऱ्या नोटाही टाकल्या. संशयिताने गुजरातमधील धरमपूर येथे बोलवले. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत त्याने दिशाभूल केली. त्यामुळे पोलिसांचे पथक परत येत असताना सोनवणे यांना फोन आला. ‘मी करंजाळी येथे हाॅटेलमध्ये आहे तुम्ही तेथे या’ असे सांगून फोन बंद केला होता.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QoTZLXf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.