छत्रपती संभाजीनगरमधील जयभवानी नगर येथे धक्कादायक चोरीची घटना घडली. १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता बालाजी ज्वेलर्स या दुकानातून एका चोरट्याने ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. दुकानाचे मालक रोहित भारते हे नातेवाईकाच्या लग्नासाठी सांगलीला गेले होते. त्यांनी त्यांचे मावस भाऊ जीवन सुनील मोरे यांच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवली होती. हेल्मेट घातलेल्या एका तरुणाने दुकानात येऊन वास्तुशांतीसाठी चांदीचे नाणे खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. जीवन यांनी त्याला नाणी दाखवत असताना, चोरट्याने हातचलाखीने दागिन्यांचे पाकीट लंपास केले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ५ जोड राजकोट रिंग (१३ ग्रॅम), ७ जोड कानातील टॉप्स (१५ ग्रॅम), ८ जोड कानातील बटन टॉप्स (१४ ग्रॅम) आणि १२ जोड कानातील लटकन (३० ग्रॅम) यांचा समावेश आहे. जयभवानी नगर परिसरातील २९ ज्वेलर्स दुकानांपैकी चोरट्याने ३-४ दुकानांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. एका दुकानातून त्याने चांदीचे नाणेही खरेदी केले. घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी स्पष्टपणे दिसून आली. १६ मे रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक घोरपडे पुढील तपास करत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ba1P95i
चतुर चोरट्याची ज्वेलर्स दुकानात धाडसी चोरी:वास्तुशांतीसाठी नाणे खरेदीच्या बहाण्याने 72 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले
May 17, 2025
0