तुमच्या ॲमेझॉन खात्यातून ड्रग्जची तस्करी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत, असे धमकावून अमेरिकन नागरिकांना गेल्या वर्षभरात १०० कोटी रुपयांचा गंडा घालणारे पुण्यातील बनावट काॅल सेंटर पोलिसांनी उघडकीस आणले. त्यातील १११ पुरुष, १२ १२३ जणांना ताब्यात घेण्यात आले. यातील आठ जण टोळीतील प्रमुख असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार फरार झाला आहे. एकूण आठपैकी सहा आरोपी गुजरात तर दोन राजस्थानचे रहिवासी आहेत. जुलै २०२४ पासून खराडी परिसरात प्राइड आयकाॅन इमारतीत नवव्या मजल्यावर सुमारे दहा हजार चौरस फूट जागेत मॅग्नेटेल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाचे हे सेंटर सुरू होते. आरोपी सरजितजिंग गिरावतसिंग शेखावत (३२, मू. रा. झुंझुनू, राजस्थान), अभिषेक अजय कुमार पांडे (२६) श्रीमय परेश शहा (२९), लक्ष्मण अमरसिंग शेखावत (३१), ॲराेन अरुमन ख्रिश्चन (२९) हे सर्व मूळ अहमदाबाद, गुजरात येथील रहिवासी आहेत. मुख्य सूत्रधार करणसिंग शेखावत (३२, रा. अहमदाबाद, गुजरात, मु. रा. राजस्थान), संजय माेरे (रा. जयपूर, राजस्थान), केतन रवानी (रा. गुजरात) फरार झाले आहेत. पाेलिसांनी चार लाख दहा हजारांचे ४१ माेबाईल जप्त केले आहेत. दरमहा सात ते आठ कोटींची लूट होती काॅल सेंटरची जागा जैन नावाच्या व्यावसायिकाने दरमहा आठ लाख रुपये भाडे करारावर आरोपी संजय माेरेला दिली होती. कर्मचाऱ्यांची भरती या टोळीतील प्रमुख साथीदारांनीच केली. त्यासाठी राजस्थान, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील तरुण व तरुणींना दरमहा २५ ते ४५ हजार रुपये पगार दिला जात होता. दररोज ४० हजार डाॅलरपर्यंत म्हणजे दरमहा सात ते आठ काेटींची लूट होत हाेती. आराेपी हे पैसे क्रिप्टाेकरन्सी, ॲमेझाॅन गिफ्ट कार्डमध्ये घेऊन ते हवालामार्फत वळवत. त्यातून करणसिंग कर्मचाऱ्यांना राेखीत पगार करत हाेता. कामाची बाहेर कुठे वाच्यता केल्यास याद राखा, असेही तो धमकावत होता. ॲमेझॉनचे ग्राहक हेच होते या टोळीचे टार्गेट कुमार पांडे (२६) श्रीमय परेश शहा (२९), लक्ष्मण अमरसिंग शेखावत (३१), ॲराेन अरुमन ख्रिश्चन (२९) हे सर्व मूळ अहमदाबाद, गुजरात येथील रहिवासी आहेत. मुख्य सूत्रधार करणसिंग शेखावत (३२, रा. अहमदाबाद, गुजरात, मु. रा. राजस्थान), संजय माेरे (रा. जयपूर, राजस्थान), केतन रवानी (रा. गुजरात) फरार झाले आहेत. पाेलिसांनी चार लाख दहा हजारांचे ४१ माेबाईल जप्त केले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qIsEX2l
ॲमेझाॅन ग्राहकांना डिजिटल अरेस्टची धमकी देत होते:अमेरिकनांना 100 काेटींचा गंडा; पुण्यात कॉल सेंटरचा पर्दाफाश
May 24, 2025
0