Type Here to Get Search Results !

पुणे, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, हैदराबादसह बंगळुरू येथे विक्री:पंचवीस काेटींचा कर चुकवून आलिशान कार देशात

परदेशातील महागड्या आलिशान गाड्या भारतात वापरण्यासाठी आणण्यासाठी परदेशातून अलिशान कार आयात करताना सीमाशुल्क वाचण्यासाठी भारतीय आयात बंदरांवर आयात मूल्य चुकीचे घाेषित करून ५० टक्केपर्यंत कमी मूल्य सांगत महागड्या कार आयात करणारे रॅकेट डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआयआरआय)च्या तपासात उघडकीस आले आहे. अशाप्रकारे तब्बल ३० हून अधिक लक्झरी कार भारतात आणून त्या पुणे, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू येथे विक्री करत २५ काेटी रुपयांपेक्षा जास्त करचुकवेगिरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पुण्यातील चंदननगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या एका माजी नगरसेवकाने देखील परदेशातून आलिशान लँड क्रुझर गाडी मागवून तब्बल ८० लाख रुपयांचा कर चुकवल्याचा प्रकार समाेर आल्याची माहिती डीआरआयच्या सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात संबंधित माजी नगरसेवकाचा जबाबदेखील डीआरआयच्या तपास पथकाने नाेंदवलेला आहे. परदेशातून कार मागवताना कशा प्रकारे आर्थिक व्यवहार केला गेला आहे, याची देखील तपासणी करण्यात येत आहे. नेमके काेण काेण या व्यवहारात मध्यस्थ हाेते, बनावट कागदपत्रे कशााप्रकारे बनवली गेली याची देखील सखाेल चाैकशी केली जात आहे. डीआरआयने याच प्रकरणात हैदराबाद येथील एका व्यावसायिक फसवणुकीत सहभागी असलेल्या माेठ्या आयातदारापैकी एकाला अटक केली असून त्याने परदेशातून ८ लक्झरी कार मागवून एकूण ७ काेटींपेक्षा अधिक करचुकवेगिरी केल्याचे देखील तपासात उघडकीस आल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आाली. या प्रकरणात ज्यांनी अशाप्रकारे परदेशातून महागड्या अलिशान कार सीमाशुल्क वाचवून खरेदी केल्या. अशा प्रकारे केली जाते फसवणूक परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या राेल्स राॅयस,टाेयाेटा लँड क्रुझर,कॅडिलॅक एस्कॅलेड, हमर ईव्ही, लिंकन नेव्हिगेटर, लेक्सस अशा प्रकारच्या महागड्या गाड्यांचे सीमाशुल्क वाचण्यासाठी भारतीय आयात बंदरावर आयात मूल्य चुकीचे घाेषित करून ५० टक्केपर्यंत कमी मूल्यांकन करून उच्चभ्रू लक्झरी कार आयात केल्या जात हाेत्या. या लक्झरी कार प्रथम डाव्या ड्राइव्हमध्ये रूपांतरित करण्यासाठी व इतर बदलांसाठी अमेरिका, जपानमधून दुबई, श्रीलंकेस घेऊन जात हाेत्या.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/fEYFznH

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.