Type Here to Get Search Results !

विकृतीची सीमा ओलांडली!:नागपूरमध्ये घोडीवर बलात्कार; CCTVमुळे भेद उघड, आरोपी अटकेत

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र असतानाच आता विकृतीने सर्व सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. एका ३० वर्षीय तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. नागपूरच्या खाणी परिसरातील एका घोडेस्वारी अकादमीत १७ मे रोजी रात्री हा विकृत प्रकार घडला. ही घटना अकादमीतील सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली. ‘छोट्या सुंदर खोब्रागडे’ असं या आरोपीचं नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून, या विकृत कृत्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस घटनेच्या दिवशी रात्री सुरक्षा रक्षकाने अकादमीच्या आवारात एक संशयास्पद व्यक्ती फिरताना पाहिली. त्याने तात्काळ अकादमीच्या संचालकांना कळवले. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि त्यातून आरोपी घोडेस्वारी अकादमीत घुसल्याचं आणि तिथल्या एका घोडीवर बलात्कार केल्याचं दिसून आलं. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरोधात भारतीय दंड विधान आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. समाजाच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्न या विकृत घटनेने समाजाच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. एखाद्या प्राण्यावर असा अत्याचार करणं ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची नाही, तर मानवी संवेदनांचीही चिरफाड आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे नागपूर पोलिसांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले असून, अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना वेळीच रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1JUtbod

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.