शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार करण्यात गुंतलेला प्रशांत कांबळे ऊर्फ लॅपटाॅप याला राज्य दहशतवादविराेधी पथकाने रविवारी पिंपरी-चिंचवड परिसरातील चऱ्हाेली भागातून अटक केली. ठाणे येथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेले १५ वर्षे फरार होता, असे पोलिसांनी सांगितले. कांबळे याच्याविरुद्ध एटीएसच्या मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात बेकायदाशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये (यूएपीए) २०११ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. गेले काही वर्षे तो फरार होता. रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात आदिवासी पाड्यांमधील मुलांना शिकवण्याचे तो काम करत होता. शहरी भागात बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार तो करत होता. ओळख पटू नये म्हणून त्याने वेशांतर केले होते. एटीएसकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी करण्यात आला होता. एटीएसच्या पुणे पथकाला कांबळे हा पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील चऱ्होली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/EypM479
माओवादी चळवळीतील "लॅपटॉप’ 15 वर्षांनी अटकेत:पिंपरी-चिंचवड परिसरात ‘एटीएस’ची कारवाई
May 05, 2025
0