Type Here to Get Search Results !

तुळशीबाग महागणपतीला 1500 कलिंगडांचा नैवेद्य:शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात संकष्टी चतुर्थीला विशेष आरास

रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास... चंदन उटीचे लेपन आणि तब्बल 1 हजार 500 कलिंगडांचा नैवेद्य श्री तुळशीबाग महागणपतीला दाखविण्यात आला. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात (125) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पासमोर साकारलेला कलिंगडांचा नैवेद्य व पुष आरास पाहण्याकरिता गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने कलिंगडाचा महानैवेद्य‌ व वासंतीक चंदन उटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, दत्ताभाऊ कावरे, गणेश रामलिंग आणि परिसरातील व्यापारी उपस्थित होते. प्रसिद्ध पुष्प सजावटकार सुभाष सरपाले यांनी ही आरास साकारली. संकष्टी चतुर्थी च्या दिवशी वासंतिक चंदन उटी लेपन करण्यात आले. तसेच रात्री गणेश जागर आणि महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.| सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयात दिनांक 18 मे रोजी सर्वाना मोफत प्रवेश "आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त" रविवार, दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक सर्व अभ्यागतांसाठी मोफत खुले असेल.या संग्रहालयात 280 कलाकृतींचा प्रेरणादायी संग्रह आहे ज्यामध्ये प्रतिष्ठित भारत-रत्न पुरस्कारासह प्रशस्तिपत्र, डॉ. आंबेडकरांनी शेवटचा श्वास घेतलेला पलंग, ज्यासमोर बाबासाहेब दररोज नतमस्तक होत असत तो भगवान बुद्धांचा पुतळा, ज्या टेबल आणि खुर्चीवर बसून बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिले ते टेबल आणि खुर्ची आणि अशा अनेक कलाकृती आणि सुमारे 200 दुर्मिळ छायाचित्रे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, 3डी होलोग्राम देखील आहे ज्यामध्ये संविधान सभेत डॉ. आंबेडकर भाषण देत आहेत. हे संग्रहालय आणि स्मारक सर्व पर्यटकांसाठी "प्रेरणाभूमी" आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1hdaV9G

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.