Type Here to Get Search Results !

शहरातील पाच व्यावसायिकांची चौकशी, 17 ठिकाणी झाडाझडती:कोट्यवधींची करचुकवेगिरी 4 सराफा दुकानांवर अकोल्यात आयकर धाडी

कोट्यवधींची करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरून अकोल्यातील चार सराफा दुकानांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. ही धाड नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून ही कारवाई सुरू केली. याबाबत मोठी गोपनीयता ठेवली असल्याने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलेले नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील नंदकिशोर अलीमचंदानी यांचे पूनम ज्वेलर्स व प्रकाश ज्वेलर्स, राजेश अटलानी यांचे एकता ज्वेलर्स व प्रकाश लाेधिया (जैन) यांचे ईशा ज्वेलर्स या संपूर्ण ग्रुपवर धाड टाकण्यात आली. या ज्वेलर्सच्या अमरावती, यवतमाळ, परतवाडा येथील एकूण १७ प्रतिष्ठानांवर कारवाई सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अकोल्यातील एका सराफाचे नाव क्रिकेट सट्ट्यातही चर्चेत असल्याचे सांगितले जाते. आयपीएल दरम्यान त्याने मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. याच आधारावर कारवाई करण्यात आल्याचे समजते. या तिघांकडेही रोख, दागिने व अवैध संपत्तीची कागदपत्रे मिळाल्याची माहिती आहे. या तिघांवरही आयकर विभागाचा वाॅच होता. हाती आलेल्या माहितीचे विश्लेषण करून खात्री केल्यावर नेकलेस राेड, गांधी राेडवरील पाच व्यावसायिकांची चाैकशी करण्यात आली. दरम्यान, पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स आणि ईशा ज्वेलर्सच्या बाहेर व आतमध्ये पाेलिस बंदाेबस्त तैनात हाेता. गेल्या वर्षी आंगडिया कुरिअरवरही कारवाई मागील वर्षी १५ मे २०२४ रोजी नांदेडमध्ये आयकर विभागाकडून एक मोठी कारवाई केली. यात तपासाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत आले होते. त्यामुळे अकोल्यातील कोठडी बाजारातील अशोकराज आंगडिया कुरिअर सर्व्हिसवरदेखील आयकर विभागाने धाड टाकली होती. अशोकराज आंगडिया कुरिअरवरील तपासणीचे नांदेडमध्ये झालेल्या आयकर धाडीशी कनेक्शन असल्याने ही कारवाई करण्यात आली होती. कुरिअरच्या माध्यमातून मोठ्या रकमांचा व्यवहार झाल्याचा संशय होता. त्यामुळेच आयकर विभागाने तपासणी मोहीम सुरू केली होती.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KERv45N

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.